केंद्रीय मंत्र्यांनी टपरीवर घेतला चहाचा आस्वाद अन्‌ पैसेही दिले...!

केंद्रीय अन्न व प्रक्रिया राज्यमंत्री प्रल्हादसिंह पटेल यांच्या या कृतीमुळे कार्यकर्तेही भारावून गेले
 Pralhad Singh Patel
Pralhad Singh PatelSarkarnama

भिगवण (जि. पुणे) : कार्यकर्ता मेळावा म्हटलं की केवळ कार्यकर्त्यांना मार्गदर्शन असे समीकरण रूढ होत असताना केवळ भाषणातूनच कार्यकर्त्यांना संदेश न देता कृतीतून दिलेला संदेश हा कार्यकर्त्यांना कसा भावतो, याचे उदाहरण केंद्रीय अन्न व प्रक्रिया राज्यमंत्री प्रल्हादसिंह पटेल (Pralhad Singh Patel) यांनी शनिवारी (ता. १२ नोव्हेंबर) भाजप (BJP) कार्यकर्ते व नेते यांच्यासमोर ठेवले. इंदापूर (Indapur) तालुक्यातील भिगवण येथील मेळाव्यास जात असताना मदनवाडी-चौफुला येथील टपरीसमोर गाडी थांबवून टपरीवर चहा (Tea) घेत चहाचे पैसेही देऊन साधेपणाचा वस्तूपाठच त्यांनी कार्यकर्त्यांसमोर ठेवला. प्रल्हादसिंह यांच्या या कृतीमुळे कार्यकर्तेही भारावून गेले. (Union Minister Pralhad Singh Patel took tea at Tapri)

केंद्रीय अन्न व प्रक्रिया मंत्री प्रल्हादसिंह हे सध्या बारामती लोकसभा मतदार संघाच्या दौऱ्यावर आहेत. प्रल्हादसिंह पटेल यांच्या प्रमुख उपस्थितीत इंदापूर तालुक्यातील भिगवण येथे शनिवारी (ता. १२ नोव्हेंबर) भाजपच्या कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. बारामतीहून भिगवण येथे येत असताना मदनवाडी-चौफुला (ता. इंदापूर) येथे चहाची टपरी बघून पटेल यांनी चालकास गाडी थांबविण्याची सूचना केली.

 Pralhad Singh Patel
अटक झाली तरी ‘हर हर महादेव’विरोधातील लढाई चालूच राहणार : आव्हाडांच्या पत्नीचा निर्धार

पटेल यांनी गाडीतून उतरुन समोर असलेल्या चहाच्या टपरीवर पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह चहाचा आस्वाद घेतला. केंद्रीय मंत्री पटेल यांनी तेथे उपस्थित नागरिक, कार्यकर्ते यांच्याशी मनमोकळा संवाद साधला. चहा घेतल्यानंतर त्यांनी स्वतः चहाचे पैसेही दिले. पटेल यांनी कृतीतून कार्यकर्त्यांना साधेपणाचा संदेश दिल्याची चर्चा रंगली हेाती.

 Pralhad Singh Patel
मोठी बातमी : आव्हाडांनी नाव घेतलेल्या डीसीपी राठोडांची तडकाफडकी बदली

या वेळी बारामती लोकसभा मतदार संघाचे प्रभारी आमदार राम शिंदे, माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य मारुतराव वणवे, तेजस देवकाते, माऊली मारकड, संदीप खुटाळे आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com