केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार उद्या पुणे पालिकेत

कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत महापालिकेने आरोग्य सुविधांसाठी मोठे काम केले.
Dr. Bharati Pawar
Dr. Bharati PawarSarkarnama

पुणे : कोरोना काळात गेल्या दीड वर्षात पुणे महापालिकेने केलेले काम तसेच तिसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यासाठी महापालिकेने केलेल्या तयारीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार उद्या पुणे महापालिकेला भेट घेणार आहेत.

Dr. Bharati Pawar
पुणे महापालिका निवडणुकीकडे अमित शहांचे आहे लक्ष

कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत महापालिकेने आरोग्य सुविधांसाठी मोठे काम केले. दोन जम्बो रुग्णालय उभारण्यासह महापालिकेच्या रुग्णालयांचे सक्षमीकरण केले.ऑक्सिजन प्लांट उभारले, खासगी रुग्णालयात बेड न मिळाल्याने, ऑक्सिजन संपल्याने आणीबाणीच्या स्थितीत महापालिकेच्या रुग्णालयात उपचार करण्यात आले. विशेषतः दुसऱ्या लाटेत शहरात रोज हजारो रुग्ण सापडत असताना अनेक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. महापालिकेने आता तिसऱ्या लाटेसाठी सुद्धा तयारी करून ठेवली आहे. याचाच आढावा घेण्यासाठी डॉ. भारती पवार सोमवारी १२ महापालिकेत बैठक घेणार आहेत.

Dr. Bharati Pawar
किरीट सोमय्या म्हणाले; हसन मुश्रिफांना तुरूंगात जावेच लागणार

या संदर्भात बोलताना महापौर मुरलीधर मोहोळ म्हणाले, ‘‘ गेल्या दी वर्षात पुणे पालिकेने कोरोनाचा मुकाबला मोठ्या हिमतीने केला आहे. पालिकेचे सर्व कर्मचारी विशेषत: आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांनी अविरत काम केले आहे. तिसरी लाट येणार हे गृहीत धरून पालिकेची तयारी सुरू केली आहे. केंद्रीय मंत्री झाल्यानंतर डॉ. भारती पवार पहिल्यांदाच पुण्यात येत आहेत.’’

Edited By : Umesh Ghongade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com