अनुभवी नेत्यांनी चुकेल त्यांचे कान धरले पाहिजेत! पवारांसमोरच राणेंनी केली तक्रार

मिळालेली सत्ता ही कोणा एका कुटुंबियासाठी नसून महाराष्ट्रातील 12 ते 13 कोटी जनतेसाठी आहे, अशी टीका राणे यांनी केली.
अनुभवी नेत्यांनी चुकेल त्यांचे कान धरले पाहिजेत! पवारांसमोरच राणेंनी केली तक्रार
Brands of Maharashtra ProgramSarkarnama

पुणे : केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी रविवारी पुण्यात पुन्हा एकदा ठाकरे कुटुंबावर निशाणा साधला. मिळालेली सत्ता ही कोणा एका कुटुंबियासाठी नसून महाराष्ट्रातील 12 ते 13 कोटी जनतेसाठी आहे. मी मंत्री झाल्यानंतर राज्यात उद्योग यावेत, म्हणून अनेक प्रयत्न केले. पत्र पाठवलं पण उत्तर नाही, अशी तक्रार करत राणे यांनी अनुभवी नेत्यांनी देखील चुकेल त्यांचे कान धरले पाहिजेत तरच आपण राज्याचे, देशाचे नेते आहोत याचे समाधान वाटते, अशी अपेक्षा व्यक्त केली.

सकाळ उद्योग समूहाच्या 'ब्रँडस ऑफ महाराष्ट्र' या कार्यक्रमात ते बोलत होते. या उपक्रमांअंतर्गत राज्यातील उद्योजकांचा गुणगौरव राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar), माजी मुख्यमंत्री सुशिलकुमार शिंदे (Sushilkumar Shinde), नारायण राणे, पृथ्वीराज चव्हाण, देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या हस्ते करण्यात आले. राणे बोलत असताना व्यासपीठावर पवारांसह शिंदे व चव्हाण होते.

Brands of Maharashtra Program
राजकारण तापलेलं असताना शरद पवार अन् फडणवीस एकाच व्यासपीठावर!

राणे म्हणाले, महाराष्ट्र म्हटल्यानंतर अंगात वेगळीच उर्जा संचारते. अंगात रक्त सळसळते. अशा या राज्याचा मी मुख्यमंत्री झालो याचा मला अभिमान वाटतो, गर्व वाटतो. पण मुख्यमंत्रीपद हे अभिमान आणि गर्वाने मिरवायचे नाही तर जबाबदारीचे आहे. आजपर्यंत अनेक मुख्यमंत्री झाले. यशवंतराव चव्हाण, वसंतराव नाईक यांनी महाराष्ट्राला दिशा दिली आहे. प्रगतशील राज्याची यादी येते त्यात महाराष्ट्र अग्रक्रमाने आहे.

अलीकडील काळात राज्यात उद्योग आहेत पण उद्योगात राज्य कुठे आहे याचा प्रश्न पडतो. वीज नाही, इफ्रास्ट्रक्चर नाही, कायदा सुव्यवस्था नाही. मग अशा राज्यात जीव धोक्यात घालून कोण येणार? मिळालेली सत्ता ही कोणा एका कुटुंबियासाठी नसून महाराष्ट्रातील 12 ते 13 कोटी जनतेसाठी आहे. मी मंत्री झाल्यानंतर राज्यात उद्योग यावेत म्हणून अनेक प्रयत्न केले. आता पत्र पाठवलं पण त्याल उत्तर नाही, असं राणे यांनी सांगितलं.

Brands of Maharashtra Program
राणा दाम्पत्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

मी प्रयत्न केले. मुख्यमंत्री, उद्योग मंत्री यांना पत्र लिहीले पण त्याला उत्तर नाही. त्यामुळे हे विकासाचे राज्य आहे की सुडाचे राज्य? अनुभवी नेत्यांनी देखील चुकेल त्यांचे कान धरले पाहिजेत तरच आपण राज्याचे, देशाचे नेते आहोत याचे समाधान वाटते, असंही राणे म्हणाले. दरम्यान, सध्याच्या राजकीय स्थितीच्या पार्श्वभूमीवर या कार्यक्रमात शरद पवार, देवेंद्र फडणवीस हे एकाच व्यासपीठावर अनेक दिवसांनी एकत्र आले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.