अमित शहांनी दगडूशेठ हलवाई गणपतीला घातलं 'हे' साकडं...

अमित शहा यांच्या दौऱ्यानिमित्त भाजपने शक्तीप्रदर्शनाची जोरदार तयारी केली आहे.
Amit Shah

Amit Shah

Sarkarnama

पुणे : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांच्या दौऱ्यानिमित्त भाजपने (BJP) शक्तीप्रदर्शनाची जोरदार तयारी केली आहे. शहा यांच्या दौऱ्याच्या निमित्ताने आगामी महापालिका निवडणुकीच्या प्रचाराच्या तयारीचा प्रारंभ भाजप करणार आहे. शहा यांचा पुणे (Pune) दौरा रविवारी सकाळी दगडूशेठ हलवाई गणपतीच्या (DagaduSheth Halwai Ganpati) दर्शनाने झाला. यावेळी शहांनी मंदिरात पूजा करत गणरायाला साकडं घातलं.

आगामी महापालिका निवडणुकीच्या (PMC Election) निमित्ताने शहा यांचा हा दौरा महत्वाचा मानला जात आहे. त्यामुळे भाजपनेही या दौऱ्याची जय्यत तयारी केली आहे. भाजपच्या बूथ कार्यकर्त्यांचा मेळावा गणेश कला क्रीडा मंच येथे आयोजित केला असून, त्यात शहा हे मार्गदर्शन करणार आहेत. त्यासाठी भाजपच्या नेत्यांनी कंबर कसली आहे. शहा हे रविवारी दिवसभर पुण्यात विविध कार्यक्रमांना हजेरी लावणार आहे.

<div class="paragraphs"><p>Amit Shah </p></div>
शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या विटंबनेनंतर राष्ट्रवादीने घेतला मोठा निर्णय

शहा यांनी रविवारी सकाळी 10 वाजता श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेतले. यावेळी शहा यांनी महाराष्ट्रासह भारत लवकर कोरोनामुक्त होवो, अयोध्येतील राममंदीर कोणत्या अडथळ्यांशिवाय उभे राहू दे आणि आत्मनिर्भर भारताचे स्वप्न पूर्ण होवो, असं साकडं शहा यांनी गणपतीला घातलं.

त्यानंतर चाकण येथील एनडीआरएफचा कार्यक्रमाला ते उपस्थित राहणार आहेत. दुपारी वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकार संस्थेच्या कार्यक्रम झाल्यानंतर पुणे महापालिकेत छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाचे भूमिपूजन आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे लोकर्पण शहा यांच्या हस्ते होणार आहे.

त्यानंतर भाजपच्या बूथ कार्यकर्त्यांचा मेळावा गणेश कला क्रीडा मंच येथे आयोजित केला असून, त्यात शहा हे मार्गदर्शन करणार आहेत. हा कार्यक्रम संपल्यानंतर शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी शहा पर्वती पायथा येथील घरी जाणार आहेत. शहा यांचा काही वर्षानंतर पुण्यात भरगच्च कार्यक्रम होणार आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा दौरा होत असल्याने भाजपमध्ये उत्साह संचारला आहे.

शहराध्यक्ष मुळीक यांच्या घरी जेवण

शासकीय व राजकीय कार्यक्रम संपल्यानंतर सायंकाळी साडे सातच्या सुमारास अमित शहा हे भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या वडगाव शेरी येथील घरी जेवणासाठी जाणार आहेत. पक्षाचे काही नगरेसवक व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. अमित शहा घरी येणार असल्याने मुळीक कुटुंबियांनी जय्यैत तयारी सुरू केली आहे. यावेळी मराठमोळ्या पद्धतीचे जेवण असणार असल्याचे मुळीक यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com