विधान परिषदेचा तिढा! उमा खापरेंचा मार्ग सुरक्षित पण प्रसाद लाड 'डेंजर झोन'मध्ये

विधान परिषदेसाठी भाजपने (BJP) पाच उमेदवार दिले आहेत
Uma Khapre
Uma Khapresarkarnama

पिंपरी : विधानपरिषदेच्या (Legislative Council Election) चार जागा निवडून येईल एवढ्या आमदारांचे बळ विधानसभेत असताना भाजपने पाच उमेदवार दिले. एवढेच नाही, तर अपक्ष सहावे सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांना समर्थन आज जाहीर केले. दरम्यान, घोडाबाजार करू न शकणाऱ्या पक्षाच्या महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा पिंपरी-चिंचवडकर (Pimpri-Chinchwad) उमा खापरे (Uma Khapre) यांना पक्षाने सेफ झोनमध्ये (पहिले चार उमेदवार) ठेवल्याची खात्रीशीर माहिती आज मिळाली. त्याला खुद्द खापरे यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर मुंबईहून 'सरकारनामा'शी बोलताना दुजोरा दिला. (Legislative Council Latest Marathi News)

Uma Khapre
राज्यसभेच्या चाव्या ठाकूरांच्या हाती! 'बविआ'च्या तीन आमदारांची मतं ठरणार निर्णायक

पंकजा मुंडे या विधानपरिषदेसाठी तीव्र इच्छूक असताना अजिबात इच्छूक नसलेल्या खापरे यांना ही संधी काल पक्षाने देत त्यांना आश्चर्याचा जोरदार धक्का दिला. अनपेक्षितपणे ही लॉटरी लागल्याने बेसावध खापरेंना अर्ज दाखल करण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची जुळवाजुळव युद्धपातळीवर करावी लागली.

त्यामुळे काल, नाही, तर आज दुपारी त्यांनी मुंबईत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांच्यासमवेत प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, महिला मोर्चा सरचिटणीस दिपाली मोकाशी, अश्विनी जिचकार, रिदा रशीद, अॅड. वर्षा डहाळे, दिव्या ढोले आदी महिला मोर्चाच्या पदाधिकारी उपस्थित होत्या.

Uma Khapre
राज्यसभेच्या मतांचा कोटा कमी! फायदा शिवसेनेला की भाजपला?

चार उमेदवार निवडून आल्यानंतर भाजप, त्यांचे मित्रपक्ष व संलग्न अपक्ष यांच्याकडे फक्त पाच मते राहतात. आपला पाचवा उमेदवार निवडून आणण्यासाठी त्यांना आणखी २२ मतांची बेगमी करावी लागणार आहे. त्यात त्यांनी सहावे उमेदवार सदाभाऊ खोत यांना आज पाठिंबा जाहीर केला. पण, तो उद्या राज्यसभेसाठी होत असलेल्या सहा जागेच्या निवडणुकीत दगाफटका होऊ नये आणि आवश्यक मतांची बेगमी व्हावी म्हणून भाजपने खोतांना अपक्ष उभे करून त्यांना पाठिंबा देण्याची चाल खेळल्याची चर्चा आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in