उद्धव ठाकरे हे तर ‘मॅटिनी मुख्यमंत्री’

‘‘ गेल्या १८ महिन्यांच्या काळात मुख्यमंत्री म्हणून ठाकरे यांचा जनसंपर्क किती ?
vikrant patil.gif
vikrant patil.gif

पुणे : कुवत नसणारी लोकं आजकाल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर बोलू लागली आहेत. गेल्यावेळी शिवसेनेचे निवडून आलेले खासदार हे पंतप्रधान मोदी यांच्या जीवावर निवडून आलेत हे शिवसेना विसरलेली दिसते, अशी टीका भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांनी केली आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना तर जनमानसात ‘मॅटिनी मुख्यमंत्री’ म्हणून ओळखण्यात येऊ लागले आहे. गेल्या वर्षभरात त्यांनी मुख्यमंत्री म्हणून मंत्रालयात पाय ठेवलेला नाही, अशी टीका पाटील यांनी केली आहे.(Uddhav Thackeray is the 'Matinee Chief Minister') 

शिवसेनेचे माध्यमप्रमुख हर्षल प्रधान यांनी लिहिलेल्या पत्राला उत्तर म्हणून पाटील यांनी हे पत्र युवासेना प्रमुख व पर्यायवरण मंत्री अदित्य ठाकरे यांना लिहिले आहे. या पत्रात पाटील यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व राज्य सरकारवर टीका केली आहे. या पत्रात पाटील म्हणतात, ‘‘ गेल्या १८ महिन्यांच्या काळात मुख्यमंत्री म्हणून ठाकरे यांचा जनसंपर्क किती ? याउलट विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस राज्यभर फिरून जनतेच्या अडीअडचणी समजून घेत आहेत. फडणवीस यांनी त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात मोडून कोढलेले ‘व्हीआयपी कल्चर’ ठाकरे यांच्या काळात फोफावले आहे. माझे कुटुंब माझी जबाबदारी असे आवाहन राज्यातील जनतेला करताना मुख्यमंत्री मात्र, वेगळ्या अर्थाने आपल्या कुटुंबापुरतेच पाहात आहे. माझे कुटुंब माझी जबाबदारी हे तत्व ते आपल्या घरापुरते पाळताना दिसत आहेत.’’

मुबंईबाहेर पडा आणि मुंबईबाहेरील महाराष्ट्र समजून घेत युवकांची परिस्थिती सावरण्यासाठी प्रयत्न करा, असे आवाहन या पत्रात अदित्य ठाकरे यांना करण्यात आले आहे. संजय राठोड, अनिल देशमुख आणि आता तुमचे अनिल परब अडचणीत आहेत याचे तुम्हीही साक्षीदार आहात. इतकी भयंकर परिस्थिती तुमच्याकडे आहे. रोज नवे ‘प्रताप’ बाहेर येत असताना तुम्ही केंद्राकडे बोट दाखवून स्वत:चं भ्रष्ट राजकारण झाकण्याचा प्रयत्न का करीत आहात, असा प्रश्‍न या पत्रात विचारण्यात आला असून अदित्य ठाकरे यांनी या प्रश्‍नांची उत्तरे द्यावीत, असे आव्हान देण्यात आले आहे.
Edited By : Umesh Ghongade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com