उद्धव ठाकरेंनी राज्य सरकारला दिले थेट आव्हान !

राजकारणाचे खोटे खेळ खेळण्यापेक्षा विधानसभा निवडणुका जाहीर करा.
 Uddhav Thackeray
Uddhav Thackeray Sarkarnama

पुणे : राजकारणाचे खोटे खेळ खेळण्यापेक्षा विधानसभा निवडणुका (Assembly Election) जाहीर करा.जनतेच्या मनात नेमके काय आहे ते कळेल.जनतेचा निर्णय आमच्यासाठी शिरसावंद्य असेल. तुम्ही निवडणुका घ्या, असे खुले आव्हान शिवसेनेचे कार्यकारी अध्यक्ष, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आज राज्य सरकारला दिले.

 Uddhav Thackeray
मुख्यमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय ; पोलिस महासंचालक-आयुक्तांना सूचना

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेतून बाहेर पडलेला गट आणि त्यानंतर गेल्या पंधरा दिवसात घडलेल्या घडामोडींचा संदर्भ ठाकरे यांच्या वक्तव्यामागे होता. भारतीय जनता पार्टीकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या माध्यमातून खेळी खेळल्या जात असल्याचा आरोप करण्यात येत आहे. या पाश्‍र्वभूमीवर ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेत राज्य सरकारला आव्हान दिले.

 Uddhav Thackeray
उमेश कोल्हे हत्या प्रकरणात NIA कडून स्पष्टीकरण ; आंतरराष्ट्रीय कनेक्शन ?

नव्या मंत्रिमंडळाचा विस्तार येत्या काही दिवसात होणार आहे. शिवसेनेत फूट पाडण्याचे कारस्थान दिल्लीतून झाल्याची टीका राऊत यांनी नुकतीच केली आहे. या साऱ्या पार्श्वभूमीवर आज पत्रकार परिषदेत बोलताना राज्य सरकारला खुले आव्हान दिले आहे. राज्यात मुख्वमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी सरकारच्या विरोधात विशेषतः शिवसेनेतून कुठून गेलेल्या आमदारांच्या विरोधात कडक भूमिका कायम ठेवल्याचे यातून स्पष्ट होत आहे.

सरकार स्थापन झाल्यानंतर आता मूळ शिवसेना कुणाची हा वाद निर्माण झाला आहे. हा वाद निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयापर्यंत जाण्याची शक्यता आत्ताच्या राजकीय परिस्थितीतून दिसत आहे. मूळ शिवसेनेला कोणीही हात लावू शकत नाही. धनुष्यबाण हे शिवसेनेचे चिन्ह आहे ते शिवसेनेपासून कुणीही हिरावून घेऊ शकत नाही, असे आजच्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांनी निक्षून सांगितले. दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून आपलीच शिवसेना ही मूळ शिवसेना असल्याने धनुष्यबाण हे चिन्ह आपल्याच शिवसेनेला मिळेल, असा विश्वास व्यक्त केला आहे. नजीकच्या काळात उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना यांच्यात बराच राजकीय संघर्ष होण्याची शक्यता आहे. सध्या सुरू असलेल्या घडामोडी आणि आरोप प्रत्यारोप त्याच दिशेने जाताना दिसत आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in