नेते सोडून गेलेल्या तालुक्यात ठाकरेंची मोर्चेबांधणी ..दांगट यांना केले सक्रिय

माजी आमदार बाळासाहेब दांगट (Balasaheb Dangat) पुन्हा शिवसेनेत सक्रिय होणार
Balasaheb Dangat-Uddhav Thackeray
Balasaheb Dangat-Uddhav Thackeraysarkarnama

पुणे : शिवसेनेला पुणे जिल्ह्यात मोठा धक्का बसलेला असल्याने आता खुद्द ठाकरे यांनीच जुन्या नेत्यांना पुन्हा साद घालण्यास सुरवात केली आहे. विद्यमान खासदार श्रीरंग बारणे, माजी राज्यमंत्री विजय शिवतारे, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, माजी आमदार शरद सोनवणे, जिल्हा प्रमुख असे अनेक जण बंडखोरांना सामील झाल्याने काही तालुक्यांत तर शिवसेनेला नेता मिळणे अवघड झाले आहे.

जुन्नर तालुक्यातही अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. माजी आमदार शरद सोनवणे यांनी बंडखोरांचा साथ देण्याचा निर्णय घेतला. त्या आधीच तेथील स्थानिक नेत्या आशा बुचके या भाजपमध्ये गेल्या आहेत. त्यामुळे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना माजी आमदार बाळासाहेब दांगट यांची आठवण झाली. शिवसेनेकडून दोन वेळा आमदार राहिलेले दांगट हे पक्षातील कुरघोड्यांना कंटाळून राजकारणापासून दूर गेले होते. त्यांनी काॅंग्रे्समध्ये प्रवेश केला होता. पण तेथे ते फारसे सक्रिय नव्हते.

Balasaheb Dangat-Uddhav Thackeray
आदित्य ठाकरेंना सुहास कांदे विचारणार `माझे काय चुकले?`

दांगट कुटुंब आणि शिवसेना यांचे जुने नाते आहे. मुंबईत दबदबा टिकवून असललेले वृत्तपत्र एजंट बाजीराव दांगट आणि बाळासाहेब यांना शिवसेनेतील बंडखोरीबद्दल चीड असल्याने त्यांनी संभाजी तांबे यांच्याशी संपर्क साधला होता.

जुने शिवसैनिक असल्याने त्यांनाही बंडखोरीबद्दल चीड निर्माण झाली होती. स्वतःच दांगट यांनी संभाजी तांबे यांच्यासाख्या जुन्नरच्या पदाधिकाऱ्यांसह संपर्क साधला होता. त्यांनी ठाकरे यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर बाजीराव दांगट यांनी ती भेट घडवून आणली, अशी माहिती शिवसेनेचे नेते रवींद्र मिर्लेकर यांनी दिली.

जुन्नरमध्ये पुन्हा भगवा फडकविण्याची ठाकरे यांनी घातल्यानंतर बाळासाहेब आणि बाजीराव दांगट हे दोन्ही बंधू आज `मातोश्री`वर गेले. या वेळी शिवसेनेचे नंदुरबार संपर्कप्रमुख आणि मूळचे जुन्नर तालुक्यातील असणारे बबन थोरात, निलेश बाळासाहेब दांगट हे या वेळी उपस्थित होते. शिवसेनेत पुन्हा सक्रिय होण्याचे दांगट यांनी मान्य केले आहे. त्यानुसार जुन्नरमध्ये मोठा मेळावा होणार असल्याची माहिती देण्यात आली. दांगट यांच्या घरवापसीमुळे जुन्नरमध्ये तरी पक्षाला नेता मिळणार आहे.

दरम्यान पुणे जिल्ह्यातील पडझड थांबविण्यासाठी रवींद्र मिर्लेकर, सचिन अहिर या नेत्यांना शिवसेनेने सक्रिय केले आहे. आढळराव यांच्यावर जोरदार टीका करून या दोन नेत्यांनी त्याची चुणूक दाखवली आहे. आगामी काळात आणखी काही जुन्या नेत्यांना जवळ केले जाण्याची शक्यता आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com