Uday Samant Attack: शिवसेनेचे शहराध्यक्ष थरकुडे, नगरसेवक धनवडेंना अटकपूर्व जामीन

शिवसैनिकांना जाणीवपूर्वक अडकविण्यात येत असल्याचा डॉ. नीलम गोऱ्हे (Dr. Neelam Gorhe) यांचा आरोप.
Uday Samant|
Uday Samant|Sarkarnama

पुणे : माजी मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांच्यावरील हल्ला प्रकरणातील संशयित आरोपी शिवसेनेचे शहराध्यक्ष गजानन थरकुडे (Gajanan Tharkude) व नगरसेवक विशाल धनवडे यांना जिल्हा सत्र न्यायालयाने आज अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.

Uday Samant|
केंद्र सरकारने जाहीर केली ऊस एफ.आर.पी. फसवी : किसानसभेने केला निषेध

या प्रकरणात शिवसेनेचे शहराध्यक्ष संजय मोरे व हिंगोलीचे संपर्कप्रमुख बबन थोरात यांच्यासह सहाजणांना यापूर्वीच अटक करण्यात आली असून हे सर्वजण सध्या पोलीस कोठडीत आहेत. दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पुण्यात दौरा होता.त्याचदिवशी शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांची पुण्यात कात्रज चौकात जाहीरसभा होती. यावेळी या ठिकाणावरून माजी मंत्री उदय सामंत यांची मोटार जात होती. त्यावेळी शिवसैनिकांनी त्यांच्या मोटारीवर हल्ला केल्याचा आरोप करण्यात येत आहे.

Uday Samant|
PCMC : अजितदादांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी पालिका निवडणुकीचे रणशिंग फुंकणार

या प्रकरणी माजी मंत्री सामंत यांनी तक्रार दिल्यानंतर सुमारे १५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संजय मोरे व बबन थोरात यांच्यासह सहाजणांना अटक करण्यात आली. या दरम्यान, थरकुडे व धनवडे यांनी जामीनासाठी जिल्हा सत्र न्यायालयात अर्ज केला होता. न्यायालयाने त्यांना आज अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.

दरम्यान, पुण्यातील हल्ल्यात शिवसैनिकांचा सहभाग नव्हता. शिवसनेच्या कार्यकर्त्यांना जाणीवपूर्वक या प्रकरणात अडकवण्यात आले आहे. राज्यातदेखील विविध ठिकाणी वेगवेगळ्या प्रकरणात जाणीवपूर्वक अडकवण्यात येत असल्याचा आरोप शिवसेनेच्या नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केला आहे. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात आणून देण्यासाठी डॉ. गोऱ्हे यांनी शिवसेनेच्या नेत्यांसह पोलीस महासंचालक रजनीश शेठ यांची आज भेट घेऊन निवेदन दिले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in