Uday Samant Attack : राष्ट्रवादीला वादात ओढणाऱ्या पडळकरांविरोधात पोलिसांकडे धाव

सामंत यांच्यावरील हल्ल्यात राष्ट्रवादीचा हात असल्याचा आरोप पडळकर (Gopichand Padalkar) यांनी केला आहे.
Gopichand Padalkar
Gopichand Padalkar sarkarnama

पुणे : माजी मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांच्यावर पुण्यात झालेला हल्ला राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केल्याचा आरोप करणाऱ्या आमदार गोपीचंद पडळकर यांच्याविरोधात पुणे राष्ट्रवादी कॉंग्रेसचेवतीने पोलिसांत तक्रार देण्यात आली आहे. पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप (Prashant Jagtap) व उपाध्यक्ष रूपाली पाटील-ठोंबरे यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून तातडीने गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

Gopichand Padalkar
काँग्रेसच्या अडचणीत भर; मल्लिकार्जुन खर्गेनांही ईडीने बोलावले

दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पुण्यात दौरा होता. या दरम्यान माजी मंत्री उदय सामंत यांच्या मोटारीवर शिवसैनिकांनी हल्ला केला. या प्रकरणी शिवसेनेचे शहराध्यक्ष संजय मोरे यांच्यासह सहाजणांना अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी दिली आहे.या प्रकरणातील आणखी काही आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.

Gopichand Padalkar
पंढरपुरातील राष्ट्रवादीचा बडा नेता एकनाथ शिंदेंच्या गळाला; शहाजीबापूंनी लावली फिल्डिंग!

दरम्यान, या प्रकरणात आमदार पडळकर यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचा हात असल्याचा आरोप केला होता. शिवसेनेचे पुण्यात मोठ्या संख्येने लोक नाहीत. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्याच कार्यकर्त्यांनी गळ्यात भगवे उपरणे घालून आमदार सामंत यांच्यावर हल्ला केल्याचा आरोप आमदार पडळकर यांनी केला आहे. त्यावर संतप्त झालेल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पडळकर यांच्याविरोधात भूमिका घेतली. त्यानंतर राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी पोलीस ठाण्यात जाऊन आमदार पडळकर यांच्याविरोधात तक्रार दिली आहे.

राज्यात जिथे मोठ्या सभा असतात त्या ठिकाणी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते जातात. त्यामुळे आमदार सावंत यांच्यावरील हल्ल्यात राष्ट्रवादीचेच कार्यकर्ते असल्याचा ठाम आरोप आमदार पडळकर यांनी केला आहे. राष्ट्रवादीच्यावतीने देण्यात आलेल्या या तक्रारीवर पोलिसांकडून गुन्हा दाखल केला जातो की नाही हे येत्या काळात स्पष्ट होईल. मात्र, या प्रकरणात राष्ट्रवादीचे नाव घेऊन आमदार पडळकर यांनी खळबळ उडवून दिली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com