बारामतीच्या माळेगावात विषारी ताडी प्यायल्याने दोन तरुणांचा मृत्यू

या मृत्युमुखी पडलेल्या युवकांसमवेत भय्यू चिनापा गायकवाड, सनी चिनाप्पा गायकवाड, भीमा कलाप्पा भोसले ह्या तीन युवकांनीही ताडीचे सेवन केलं होते.
Death
DeathSarkarnama

माळेगाव (जि. पुणे) : बारामती (Baramati) तालुक्यातील माळेगाव बुद्रुक येथे विषारी ताडी पिल्याने भटक्या समाजातील दोन युवकांचा मृत्यू (Die) झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. राजू लक्ष्मण गायकवाड (वय ३५), हनुमंता मारुती गायकवाड (वय ४०, दोघेही रा. चंदननगर, माळेगाव बुद्रुक, ता. बारामती) अशी मृत्युमुखी पडलेल्या तरुणांची नावे आहेत. (Two youths die after drinking poisonous toddy in Baramati)

या मृत्युमुखी पडलेल्या युवकांसमवेत भय्यू चिनापा गायकवाड, सनी चिनाप्पा गायकवाड, भीमा कलाप्पा भोसले ह्या तीन युवकांनीही ताडीचे सेवन केलं होते. पण, त्यांना कोणताही त्रास होत नसल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. असे असले तरी संबंधितांवर ४८ तास वैद्यकीय अधिकारी लक्ष ठेवून राहणार असल्याचे सांगण्यात आले.

Death
मोहोळमधून संधी मिळाली नसती, तर आज मी माळशिरसचा आमदार असतो : राष्ट्रवादी आमदार मानेंचा गौप्यस्फोट

मयत राजू गायकवाड यांच्या मागे पत्नी, दोन मुलगे, एक मुलगी असा परिवार आहे, तर हनुमंता गायकवाड यांच्या मागे पत्नी दोन मुलगे व एक मुलगी असा परिवार आहे.

Death
रणजितदादांच्या मंत्रिपदासाठी वकिली करू; भाजपमध्येही आमचे ऐकणारे आहेत : राजन पाटलांचे मोठे वक्तव्य

दरम्यान, माळेगाव बुद्रुक परिसरामध्ये अवैध दारू व्यवसाय, तसेच ताडी विक्री करणाऱ्या व्यवसायिकांवर अलीकडच्या काळात पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई केल्याची नोंद आहे. असे असतानाही आज माळेगावमध्ये ताडी विक्री करणाऱ्या व्यक्तीकडून विषारी ताडी-विक्रीचे सेवन झाल्याने दोघांचा मृत्यू झाला आहे.

Death
'मी बोअर झालोय, मला गाणं म्हणून दाखव' : अवर सचिवाची महिला अधिकाऱ्याकडे फर्माईश!

याबाबत माळेगावचे पोलिस निरीक्षक किरण अवचार म्हणाले की, माळेगावमध्ये घडलेली घटना ही दुर्दैवी असून याबाबत पोलिस कसून तपास करीत आहेत. या दुर्घटनेमध्ये मृत्युमुखी पडलेल्या कुटुंबाला आधार देण्याचे काम पोलिसांनी सुरू केले आहे. तसेच, या घटनेचा अहवाल वरिष्ठ पातळीवर पाठवण्याची प्रक्रिया हाती घेतली आहे, अशी माहिती त्यांनी दिली. दुसरीकडे, माळेगाव पोलिसांनी गावात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आल्याचे सांगण्यात आले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com