देहू संस्थानचे एक विश्वस्त, दोन नेते जुगार खेळताना पकडले; 35 लाखांचा ऐवज जप्त

श्रीक्षेत्र देहू (Dehu) (ता.हवेली) येथील एका मोठ्या जुगार अड्यावर धाड टाकून पोलिसांनी (Police) तेथून 26 जुगाऱ्यांना पकडले.
Police
Policesarkarnama

पिंपरी : श्रीक्षेत्र देहू (Dehu) (ता.हवेली) येथील एका मोठ्या जुगार अड्यावर धाड टाकून पोलिसांनी (Police) तेथून 26 जुगाऱ्यांना पकडले. त्यांच्याकडून 35 लाख रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे नवनिर्मित देहू नगरपंचायतीचे एक नगरसेवक, एका नगरसेविकेचे पती आणि देहू येथील संत तुकाराम महाराज देवस्थानच्या एका विश्वस्तांचा या जुगाऱ्यांत समावेश असल्याचे स्थानिक पोलिसांनी सांगितले.

येलवडी रस्त्यावर एका कंपनीच्या आत हा तीनपानी जुगार सुरु होता. पकडले गेलेले सर्व माळवाडी, देहूचे रहिवासी आहेत. त्यात स्थानिक कापड व्यापारी, केबलचालक, नोकरदार, रिक्षाचालक, सुरक्षारक्षक, सेवानिवृत्तांसह नगरसेवक, नगरसेविकेचा पती, देहू संस्थानच्या विश्वस्ताचाही समावेश आहे.

Police
PMC Election 2022 : इच्छुक मेटाकुटिला; पुन्हा चारचा प्रभाग; नगरसेवकही सातने घटले...

त्यामुळे देहूत प्रचंड खळबळ उडाली आहे. या जुगाऱ्यांकडून पाच लाख 36 हजार 610 रुपयांची रोकड, दोन मोटारी, 18 मोटारसायकली आणि 27 मोबाईल असा 35 लाख दहा हजार 270 रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. आरोपींविरुद्ध जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे महाळूंगे पोलिस चौकीचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांनी सरकारनामाला सांगितले.

Police
पिंपरी महापालिका मुख्यालयात पुन्हा लाचखोरी : एसीबीची मोठी कारवाई

पोलिस आयुकत अंकुश शिंदे अवैध धंद्यावर कारवाईचे आदेश दिले होते. त्यानुसार दरोडा विरोधी पथक आणि गुन्हे शाखा युनीट पाचच्या पथकाने ही कारवाई केली. दरोडा विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रामदास इंगवले यांना याबाबत खबर मिळाली होती. त्यावर त्यांनी गुन्हे शाखेचे डीसीपी डॉ. काकासाहेब डोळे आणि एसीपी पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली काल मध्यरात्री दोन वाजता या जुगार अड्यावर धाड टाकली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in