Pimpri-Chinchwad News : राष्ट्रवादीत धुसफूस; आमदारांची पक्षाच्या ठरावा विरोधातच भूमिका

Pimpri-Chinchwad News : चिंचवड विधानसभा निवडणूक लढवण्यावरुन राष्ट्रवादीमध्ये एकमत नाही.
ncp
ncpSarkarnama

Pimpri-Chinchwad News : भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप (Laxman Jagtap) यांच्या निधनामुळे लागलेली चिंचवड विधानसभेची पोटनिवडणूक लढण्याचा ठराव पिंपरी-चिंचवड (Pimpri-Chinchwad) शहर जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या (NCP) बैठकीत काल (ता.२०) करण्यात आला. कोणत्याही परिस्थितीत घड्याळ या चिन्हावरच निवडणूक लढायचे त्यात ठरले. मात्र, जगताप कुटुंबातील उमेदवार असेल, तर ही निवडणूक बिनविरोध करावी, अशी भुमिका राष्ट्रवादीचे पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे यांनी आज (ता.२१) मांडली.

चिंचवड लढण्याच्या पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादीने कालच केलेल्या ठरावाला छेद देणारी भूमिका लगेचच बनसोडेंनी घेतल्याने त्याची चर्चा सुरु झाली आहे. बिनविरोध निवडणुकीची अपेक्षा व्यक्त करताना त्याचवेळी त्यांनी सामंजस्याची सुद्धा भुमिका घेतली आहे. जर, ही पोटनिवडणूक लढायचाच निर्णय पक्षाच्या वरिष्ठ पातळीवर झाला, तर उमेदवारी, मात्र पक्षाच्या कार्यकर्त्यालाच द्यावी, म्हणजे घड्याळावरच ही निवडणूक लढवावी, असेही ते म्हणाले. त्यांचे हे म्हणणे, मात्र कालच्या ठरावाशी सुसंगत आहे.

ncp
Congress News : काँग्रेस अ‍ॅक्शन मोडवर, थेट ३८ नेत्यांची हकालपट्टी!

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यावरील नाराजीतून स्व. आ. लक्ष्मणभाऊ भाजपमध्ये गेले नव्हते, तर राष्ट्रवादीच्या स्थानिक नेते, पदाधिकाऱ्यांमुळे त्यांनी राष्ट्रवादी सोडली होती, असा गौप्यस्फोट बनसोडे यांनी 'सरकारनामा'शी बोलताना आज केला. लक्ष्मणभाऊंनी राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून पक्षासोबत काम केले असून नगरसेवक ते आमदारापर्यंतची विविध पदेही त्यांनी सांभाळली होती, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

ncp
Uddhav Thackeray News : ठाकरेंनी डाव टाकला; कदम पिता पुत्रांची कोंडी; मोठा नेता करणार घरवापसी?

दरम्यान, पिंपरी-चिंचवडमधील राष्ट्रवादीचे प्रमुख पदाधिकारी, माजी नगरसेवक हे शरद पवार यांच्या भेटीसाठी आता निघाले आहेत. ते आपली चिंचवडबाबतची भूमिका आणि भावना त्यांच्यासमोर मांडणार आहेत. त्यानंतरच ही पोटनिवडणूक बिनविरोध होणार की त्यासाठी मतदान होणार हे कळणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com