Pimpri-Chinchwad Crime News: दहा दिवसांत गोळीबार करून दुसरा खून; पिंपरी-चिंचवड हादरलं, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर

Pimpri-Chinchwad News: वर्चस्ववादातून भरदिवसा मित्रानेच केला मित्राचा खून; पिंपरी-चिंचवड हादरलं
Pimpri-Chinchwad
Pimpri-Chinchwad Sarkarnama

पिंपरी : दहा दिवसांत दुसऱ्यांदा गोळीबार करून खून झाल्याने पिंपरी-चिंचवड पोलीस आय़ुक्तालयातील कायदा सुव्यस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

तळेगाव दाभाडे नगरपरिषदेतील माजी सत्ताधारी जनसेवा विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे यांचा नगरपरिषद कार्यालयाच्या आवारातच १२ मे रोजी भरदिवसा गोळ्या झाडून खून केला होता. तर, आज चिखलीत असाच गोळीबार करून आणखी एक खून झाला.

गेल्या पावणेदोन महिन्यात आयुक्तालय हादरविणारा हा तिसरा खून आहे. त्यातील दोन खून राजकीय व्यक्तींचे आहेत. प्रतिशिर्डी शिरगावचे (ता.मावळ) सरपंच प्रवीण गोपाळे यांचा ग्रामपंचायत निवडणुकीच्या वादातून साई मंदिरासमोर कोयत्याने निर्घृण खून १ एप्रिल रोजी करण्यात आला होता.

Pimpri-Chinchwad
Rohit Pawar VS Ram Shinde: जामखेड राम शिंदेंना तर कर्जतमध्ये रोहित पवारांना लॉटरी लागणार का?

त्यानंतर मावळातच गोळ्या झाडत व कोयत्याचे घाव घालत १२ मे रोजी आवारेंचा निर्घूण खून झाला. त्यातून मावळातील कायदा व सुव्यस्थेची स्थिती सावरली नसताना तिसरा खून आणि दहा दिवसांतील दुसरा गोळीबार आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रातील चिखलीमध्ये भरदुपारी झाला. त्यातून पोलिसांचा दरारा राहिला आहे की नाही, याविषयी शहरात चर्चा सुरु झाली आहे.

Pimpri-Chinchwad
Anil Deshmukh News: अनिल देशमुख आता पुस्तकातून उलगडणार सत्य; कोणते गौप्यस्फोट करणार?

आज दुपारी पावणेदोन वाजता चिखलीच्या गावकमानीजवळ कृष्णा ऊर्फ सोन्या हरिभाऊ तापकीर (वय २०,रा.चिखली) याचा गोळ्या झाडून खून करण्यात आला. त्याचे मित्र सौरभ ऊर्फ सोन्या पानसरे (रा.मोई,ता.खेड,जि.पुणे) आणि सिद्धार्थ कांबळे यांनी गोळीबार केला.

दोघांनी जवळून गोळ्या झाडल्या. त्यात सोन्या ठार झाला. वर्चस्ववाद आणि पूर्ववैमनस्यातून हा खून झाल्याचा अंदाज आहे. मारेकऱ्यांची नावे समजल्याने त्यांच्या शोधासाठी पथके रवाना केल्याचे चिखली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर काटकर यांनी सांगितले.

Edited By : Ganesh Thombare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com