गवताची गंजी पेटून दोन बालके जळून ठार; दोघे गंभीर भाजले

fire in otur
fire in otur

ओतूर : ओतूर (ता.जुन्नर) येथील अमीरघाटात गोठ्या जवळील गवताची गंजी पेटून त्यात दोन बालकांचा जळून मत्यु तर दोन गंभीर जखमी झाले असल्याची माहिती ओतूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरिक्षक परशुराम कांबळे यांनी दिली.

आज बुधवारी सायंकाळी सात ते साडेसात वाजे दरम्यान झाली असून यात शिवा कैलास ठाकूर (वय 2 वर्षे) भाग्यश्री कैलास ठाकूर (वय 4 वर्षे) हे जळून मृत्युमुखी पडले. तर ग्यानेंद्र शुभम दमयी (वय 9 वर्षे),  नम्रता शुभम दमयी (वय 4 वर्षे) हे गंभीररित्या भाजले.

याबाबत अधिक माहिती अशी कि अमिरघाट येथे नेपाळी कुटुंब रहात असून येथे गाडगे महाराज संस्थेची शेती व गोठ्याची ही देखभाल करत आहे. यातील मुलाचे वडिल कैलास हे दूध घालण्यासाठी ओतूर येथे आले होते व घरी मुलांची आई लक्ष्मी स्वयंपाक बनवत होती तर कैलासची मुले व त्यांच्याकडे नातेवाईकाची पाहुणे म्हणून आलेली मुले असे चारही जण आज गुरासाठी आनलेल्या गवताच्या गंजी जवळ खेळत होते. अचानक सायंकाळी सात ते साडेसात वाजण्याच्या दरम्यान नुकतीच गोठ्या जवळ आणून ठेवलेल्या गवताच्या गंजीने पेट घेतला. वाऱ्यामुळे आगडोंब उसळला आणि सर्व चारही मुलांवर पेटती गवताची गंजी ढासळली. हे पाहुन लक्ष्मी यांनी आरडाओरडा केल्यावर आजूबाजूचे नागरीकांनी येवून आग विझवण्याचा व मुलाना वाचवण्याचा प्रयत्न केला. यात दोन बालके जाळून जागीच ठार झाली तर दोन गंभीर जखमी झाली. जखमी बालकांना ओतूर प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉ.श्रीहरी सारोक्ते यांनी प्रथमोपचार करुन पुढिल उपचारासाठी पुणे येथिल शासकिय रुग्णालयात पाठवले आहे. पुढील तपास ओतूर पोलिस करत आहे.

सदर घटना समजताच जुन्नर पंचायत समितीचे सभापती विशाल तांबे, गटविकास अधिकारी विकास दांगट, पांडुरंग मेमाणे, जि.प.सदस्य मोहित ढमाले,स रपंच संतोष तांबे यांनी व इतरांनी घटनास्थळी भेट दिली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com