Pune News : पुण्यात भाजप अन् 'आप'मध्ये जुंपली; मिळकतकराच्या मुद्यांवरून ट्विटरवॉर

Eknath Shinde : पुणेकरांना मिळकतकरात 40 टक्के सवलतीचा निर्णय राज्य सरकारने घेतला.
BJP VS AAP
BJP VS AAP Sarkarnama

BJP vs AAP : पुणेकरांना मिळकतकरात 40 टक्के सवलतीसह तीन पट शास्तीकर रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारने आज घेतला आहे. त्यामुळे पुणेकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

तसेच येणाऱ्या कॅबिनेटच्या बैठकीत याबाबतचा अधिकृत प्रस्ताव आणून त्याला मान्यता देण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. मात्र, आता या निर्णयावरून भाजप आणि 'आप'मध्ये चांगलीच जंपुली आहे.

भाजपचे पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी या निर्णयानंतर ''मिळतकरात पुन्हा ४० टक्के सूट मिळणार, त्यामुळे पुणेकरांची अतिरिक्त करातून सुटका होणार'', अशा आशयाचे ट्विट केलं आहे. मोहोळ यांच्या ट्विटला प्रतिउत्तर देत आम आदमी पार्टीचे डॉ. अभिजीत मोरे यांनी भाजपला सुनावलं आहे.

BJP VS AAP
Maan : देशमुख कर्तृत्वशून्य; भाजपकडे महामंडळ मागताना त्यांचे पवार प्रेम कुठे होते...

''भाजपचा हा ढोंगीपणा आहे असं म्हणत 1970 पासून मिळणारी 40 टक्के मिळकत करामधील सवलत 2019 मध्ये पुणे महानगरपालिकेत भाजपची सत्ता असताना रद्द केली. त्यामुळे मिळकत कराची सवलत रद्द करणारे तुम्ही आणि कर वाढवणारे तुम्ही व आता सूट देण्याचा ढोल पिटणारेही देखील तुम्हीच'', असं ट्विट करत अभिजीत मोरे यांनी भाजपला सुनावलं.

आम आदमी पार्टीचे राज्य संघटक विजय कुंभार यांनीही भाजपवर जोरदार टीका केली आहे. विजय कुंभार म्हणाले, ''मुळातच अशा प्रकारची नामुष्की येऊ नये, याची काळजी घ्यायला हवी होती. ज्यांनी असे निर्णय घेतले त्या भारतीय जनता पक्षाचे लोकप्रतिनिधी आणि महापालिकेचे आयुक्त या सर्व प्रकाराला जबाबदार आहेत''.

''या सर्व प्रकारात काही नागरिकांनी वाढीव पैसे भरले, आता ते परत द्यावे लागतील. परत देतील की पुन्हा पुढच्या मिळकत करात वसूल करून घेतील हे अद्याप निश्चित नाही. या सगळ्या गोष्टींमुळे या संपूर्ण विषयाचा गोंधळ झालेला आहे. त्यात नागरिकांना मात्र, अतोनात मनस्ताप सहन करावा लागला, याची जबाबदारी ज्यांनी असे निर्णय घेतले त्यांनीच घ्यायला हवी'', असं ते म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com