वधू-वरासह 22 जण पॅाझिटिव्ह..माजी आमदारांसह तीनशे जणांचे धाबे दणाणले..

नातीचा विवाह पाहण्याची इच्छा पूर्ण व्हावी, या हेतूने कोरोना बाधीत असलेली वधुची आजी विवाह सोहळ्यास उपस्थित होती.
Marriage.jpg
Marriage.jpg

नारायणगाव : कोरोना विषयक नियम व अटींचे उल्लंघन करून हिवरे तर्फे नारायणगाव येथील ओसारा हॉटेलमध्ये थाटामाटात झालेला विवाह सोहळा सामाजिक स्वास्थ बिघडविणारा ठरला आहे. आज अखेर विवाह सोहळ्यातील बावीस जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. कोरोना रूग्णांची संख्या वाढत चालल्यामुळे विवाह सोहळ्यात सहभागी झालेले माजी आमदार , व्यापारी यांच्यासह सुमारे तीनशे जणांचे धाबे दणाणले आहेत. 

यामध्ये वधु, वर, वर, पिता यांच्यासह नातेवाईकांचा समावेश आहे. वधूच्या आजीचे कोरोनामुळे नुकतेच निधन झाले आहे, अशी माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. वर्षा गुंजाळ यांनी दिली. निसर्गरम्य परिसरसतील हिवरेतर्फे  नारायणगाव येथील ओसारा हॉटेलमध्ये १३ ऑगस्ट रोजी येथील व्यापारी सहयाद्री भिसे यांच्या मुलाचा विवाह धुमधडाक्यात पार पडला. आपल्या नातीचा विवाह पाहण्याची इच्छा पूर्ण व्हावी, या हेतूने कोरोना बाधीत असलेली वधुची आजी विवाह सोहळ्यास उपस्थित होती. पुणे येथे उपचार सुरू असताना कोरोना बाधीत आजीचे निधन झाल्याने सोशल मीडियावर या नियमबाह्य विवाह सोहळ्याची चर्चा सुरू झाली. दरम्यान वधु व विवाह सोहळ्यात सहभागी झालेले अकरा जण कोरोना बाधीत झाले.

 त्यानंतर या घटनेची गंभीर दखल घेत पोलीस प्रशासनाने कार्यमालक भिसे व ओसारा हॉटेलचे मालक यांच्यावर २४ ऑगस्ट रोजी गुन्हा दाखल केला. दरम्यान कोरोनाची लक्षणे दिसू लागल्यामुळे वर ,वर पिता इतर व्यक्तींची कोरोना तपासणी करण्यात आली. शुक्रवारी सायंकाळी मिळालेल्या अहवालानुसार तपासणीत वर ,वर पिता यांच्यासह अकरा जण कोरोना पॉझीटिव्ह आढळून आले. यामुळे विवाह सोहळ्यामुळे कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णांची एकूण संख्या बावीस झाली आहे. विवाह सोहळ्यास पुणे, मुंबई व अन्य भागांतून सहभागी झालेल्या व्यक्तींची माहिती प्रशासनाला अद्याप मिळालेली नाही. नियमांचे उल्लंघन करणारा विवाह सोहळा पोलिसांनी वेळीच थांबवला असता तर कोरोनाचा संसर्ग टाळता आला असता अशी चर्चा सध्या सुरू आहे. 

या घटनेची पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी गंभीर दखल घेतली आहे. या पुढील काळात विवाह सोहळा व अन्य धार्मिक कार्यक्रम करताना नियमाचे पालन न करणारे कार्यमालक अथवा जबाबदार व्यक्तींवर कार्यक्रम सुरु असतानाच गुन्हे दाखल करा, असा आदेश दिला आहे.
 Edited  by : Mangesh Mahale  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com