बारावी मूल्यमापनाचा फॉर्म्युला ठरला : लवकरच जाहीर होणार निकालाची तारीख - Twelth Assessment Formula Decided: Result Date To Be Announced Soon | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

शरद पवार आज अमित शहांच्या भेटीला, शहांकडे सहकार खात्याचा कारभार आल्यानंतरची पहिलीच भेट

बारावी मूल्यमापनाचा फॉर्म्युला ठरला : लवकरच जाहीर होणार निकालाची तारीख

सरकारनामा ब्यूरो
शुक्रवार, 2 जुलै 2021

दहावीच्या निकालाची तारीखदेखील लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.

पुणे : राज्यातील बारावीचे सुमारे १४ लाख विद्यार्थी व त्यांचे पालक डोळे लावून बसलेल्या मूल्यमापन पद्धतीचा फार्म्युला राज्य सरकारने आज अखेर जाहीर केला. दहावीत सर्वाधिक गुण मिळालेल्या तीन विषयांचे सरासरी ३० टक्के गुण, अकरावीचे सरासरी ३० टक्के गुण तसेच बारावीच्या वर्षभरातील कामगिरीवर आधारीत ४० गुण गृहीत धरण्यात येणार आहेत.(Twelth Assessment Formula Decided: Result Date To Be Announced Soon)

सीबीएसईच्या धर्तीवर ही मूल्यमापन पद्धती आंमलात आणली जाणार आहे. दहावी-अकरावीचे प्रत्येकी सरासरी ३० टक्के गुण गृहीत धरले जाणार आहेत. बारावीच्या वर्षभरातील अंतर्गत मूल्यमाप्नातील प्रथम सत्र, सराव परीक्षा, सराव चाचण्या, तत्सम मूल्यमापन यातील विषय निहाय 40 टक्के गुण धरून १०० पैकी गुण दिले जाणार आहेत. सीबीएसईचा बारावीचा निकाल या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता आहे. राज्य मंडळाचा निर्णय आज झाल्याने येत्या काही दिवसात निकालाची तारीखदेखील जाहीर करण्यात येईल, असे शिक्षण विभागातील सूत्रांनी सांगितले. 

बारावीतील विद्यार्थ्यांची संख्या चौदा लाखांच्या आसपास आहे. मूल्यमापनाला किती वेळ लागेल याचा अंदाज घेऊन निकालाची तारीख जाहीर करण्यात येणार आहे. या महिनाअखेर निकाल लावण्याचा राज्य मंडळाचा प्रयत्न असल्याचे या सूत्रांनी सांगितले. 

बारावीच्या निमालाचा प्रश्‍न मार्गी लागल्याने आता दहावीच्या निकालाची तारीखदेखील लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.दहावीच्या मूल्यमापनाचा फार्म्युला आधीच जाहीर करण्यात आला आहे. दहावीला सुमारे सोळा लाख विद्यार्थी बसले आहेत.

Edited By : Umesh Ghongade

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख