तुपकरांचे अन्नत्याग आंदोलन : उद्यापर्यंत मार्ग न निघाल्यास आंदोलनाची व्याप्ती वाढवणार

राज्यात मुख्यत: ज्या भागात सोयाबीनचे उत्पादन होते. त्याच भागात आत्महत्यांचे प्रमाण अधिक आहे.
तुपकरांचे अन्नत्याग आंदोलन : उद्यापर्यंत मार्ग न निघाल्यास आंदोलनाची व्याप्ती वाढवणार
राजू शेट्टी-रविकांत तुपकरसरकारनामा

पुणे : सोयाबीन आणि कापसाला रास्त भाव मिळावा,सोयाबीनवरील जीएसटी रद्द व्हावा आदी मागण्यांसाठी स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी गेल्या चार दिवसांपासून सुरू केलेल्या आंदोलनात केंद्र व राज्य सरकारने उद्यापर्यंत काही मार्ग काढला नाही तर उद्यापासून आंदोलनाची व्याप्ती वाढविण्याचा इशारा स्वाभामानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी आज दिला.

राजू शेट्टी-रविकांत तुपकर
चंद्रकांत पाटील म्हणतात; कृषी कायद्यांचे महत्व समजावून सांगून पुन्हा अंमलात आणावेत

‘सरकारनामा’शी बोलताना शेट्टी म्हणाले, ‘‘ आंदोलनातून मार्ग काढण्यासाठी केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल व राज्यातील मंत्री राजेंद्र शिंगणे यांच्याशी चर्चा केली.‘जीएसटी’चा विषय अर्थ मंत्रालयाशी संबंधित असून या संदर्भात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांच्यासोबत बैठक करून देण्याचे आश्‍वासन गोयल यांनी दिले आहे. १२ लाख टन सोयाबीन आयातीला केंद्र सरकारने परवानगी दिली आहे.त्यामुळेच सोयाबीनचे दर १० हजारांवरून चार हजारांवर आले आहेत.यातील सहा लाख टन सोयाबीन भारतात आले आहे. उर्वरित आयातीची मुदत ३१ मार्चपर्यंत आहे. त्यानंतर मुदत वाढवून देण्यात येणार नाही, असे गोयल यांनी स्पष्ट केले आहे.’’

राजू शेट्टी-रविकांत तुपकर
कृषी कायद्यावरून छाती बडवण्याऐवजी राज्यातील शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन जोडून द्या

राज्यात मुख्यत: ज्या भागात सोयाबीनचे उत्पादन होते. त्याच भागात आत्महत्यांचे प्रमाण अधिक आहे. ही सारी परिस्थिती माहीत असतानादेखील १२ लाख टन सोयाबीन आयातीला केंद्र सरकारने परवानगी दिल्याचे शेट्टी यांनी सांगितले.सोयाबीनची साठेबाजी करू देता कामा नये, असे केंद्र सरकारचे बंधन आहे.मात्र,त्याची अंमलबजावणी करण्याचे आधिकार राज्याकडे असल्याचे या संदर्भात राज्य सरकारने व्यापाऱ्यांवर दबाव आणू नये, यासाठी मंत्री राजेंद्र शिंगणे यांच्याशी चर्चा केली आहे, असे शेट्टी यांनी सांगितले.

तुपकर यांच्या अन्नत्याग आंदोलनातून मार्ग काढण्यासाठी मंत्री शिंगणे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संपर्क करीत आहेत. उद्यापर्यंत यातून काही मार्ग काढण्यास राज्य व केंद्र सरकारला अपयश आले तर या आंदोलनाची व्याप्ती वाढविण्यात येईल, असे शेट्टी यांनी सांगितले.

Edited By : Umesh Ghongade

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in