ट्रेंड बदलतोय : पुणे जिल्ह्यात ‘इंग्रजी’चे दोन हजार विद्यार्थी मराठी माध्यमाच्या शाळांत दाखल

गेल्या दशकापासून ग्रामीण भागातील पालकांचा कल आपल्या पाल्यांना इंग्रजी माध्यमांच्या (Englisg Medium School) शाळेत दाखल करण्याकडे वाढला होता.
Pune ZP
Pune ZPSarkarnama

पुणे : पुणे जिल्ह्याच्या (Pune District) ग्रामीण भागात गेल्या काही दिवसांपासून आलेला इंग्रजी माध्यमांतील शाळा प्रवेशाचा ट्रेंड (कल) यंदा बदलला आहे. चालू शैक्षणिक वर्षात (२०२२-२३) ग्रामीण भागातील इंग्रजी माध्यमाच्या शाळांमधील (Englisg Medium School) तब्बल एक हजार ९५२ विद्यार्थ्यांनी आपापल्या इंग्रजी शाळेचा निरोप घेतला आहे. इंग्रजी शाळेच्या निरोपानंतर हे विद्यार्थी जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेकडे वळले आहेत. या सर्वांनी पुढील शिक्षणासाठी झेडपीच्या (ZP) शाळेत प्रवेश घेतला आहे.

Pune ZP
सरकारी जोखडातून मंदिरे मुक्त होणार; मुख्यमंत्र्यांची ऐतिहासिक घोषणा

गेल्या दशकापासून ग्रामीण भागातील पालकांचा कलही आपापल्या पाल्यांना इंग्रजी माध्यमांच्या शाळेत दाखल करण्याकडे वाढला होता. यामुळे ग्रामीण भागातील पालक मोठ्या प्रमाणात मराठी शाळांना डावलून आपापल्या पाल्यांना इंग्रजी माध्यमांच्या शाळेत दाखल करत असत. परिणामी जिल्हा परिषद शाळांमधील पटसंख्या घसरू लागली होती. परंतु यंदा हे चित्र बदलले असल्याचे इंग्रजी माध्यमातील शाळांमधील प्रवेश रद्द करून, झेडपीच्या शाळांत दाखल झालेल्या विद्यार्थी संख्येवरून स्पष्ट झाले आहे.

Pune ZP
CM एकनाथ शिंदे सिद्धिविनायकाच्या चरणी; प्रसाद लाड यांची नवसपूर्ती

चालू शैक्षणिक वर्षात मराठी शाळांकडे वळलेल्या एकूण विद्यार्थ्यांमध्ये खेड तालुक्यातील सर्वाधिक ३८६ तर, सर्वात कमी वेल्हे तालुक्यातील केवळ सहा विद्यार्थ्यांचा समावेश असल्याचे जिल्हा शिक्षणाधिकारी (प्राथमिक) संध्या गायकवाड यांनी गुरुवारी (ता.१४) सांगितले. त्या म्हणाल्या, ‘‘ पुणे जिल्हा परिषद गेल्या वर्षांपासून शाळांचा दर्जा, शैक्षणिक गुणवत्ता,अध्यापन पद्धत, शाळांमधील पायाभूत व शैक्षणिक सुविधांमध्ये बदलत्या काळानुसार बदल करत आहे. यामुळे अनेक शाळांमध्ये आमूलाग्र बदल झाले आहेत. अध्यापन पद्धती सुधारणा झाल्याने शैक्षणिक दर्जाही सुधारला गेला असल्याने, खासगी शाळांमधील विद्यार्थी झेडपी शाळांकडे वळू लागले आहेत.’’

Pune ZP
Maharashtra Politics : उदय सामंत, भुसे, देसाई अन् भूमरे यांना अजूनही मंत्रिपद सोडवेना!

कोरोना संसर्गामुळे जिल्ह्यातील अनेकांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. कारण इंग्रजी माध्यमांच्या शाळांमधील प्रवेश रद्द करण्यासाठी हेही कारण ठरु लागले आहे. कोरोनामुळे अनेकांचे रोजगार बुडाले.त्यामुळे शालेय शुल्क भरणे पालकांना अवघड झाले. शुल्क भरले नाही, तर ऑनलाइन शिक्षणही नाही, अशी भूमिका अनेक इंग्रजी शाळांनी घेतली होती. दुसरीकडे जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक शक्य तिथे ऑनलाइन, तर जिथे शक्य नाही तेथे ऑनलाइन पद्धतीने शिक्षण देत होते. झेडपी शिक्षकांनी वाड्या-वस्त्यांवर जाऊन तेथील विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे दिल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

पुणे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमध्ये इंग्रजी माध्यमांच्या शाळांच्या तोडीचे शिक्षण दिले जाते. त्यामुळे ग्रामीण भागातील पालकांची पूर्वीपासूनच झेडपी शाळांकडे ओढ आहे.परंतु मध्यंतरीच्या काळात इंग्रजी माध्यमांच्या शाळांत दाखल करण्याचा पालकांचा कल वाढला होता. ग्रामीण भागातील पालकांचा कल पुन्हा शिक्षणासाठी झेडपी शाळेत दाखल करण्याकडे वाढू लागला आहे.

- संध्या गायकवाड

जिल्हा शिक्षणाधिकारी (प्राथमिक),

जिल्हा परिषद, पुणे.

झेडपी शाळांकडे वळलेले तालुकानिहाय विद्यार्थी

आंबेगाव - ४४, बारामती - १२३, भोर - ४७, दौंड - १०८, हवेली - २६४, इंदापूर - १३५, जुन्नर - ३२, खेड - ३८६, मावळ - १६७, मुळशी - १५९, पुरंदर - ११५, शिरूर -३६६ आणि वेल्हे - ६.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in