
मंचर (जि. पुणे) : पुणे (pune) जिल्हा (ग्रामीण) पोलिस (Police) अधीक्षक कार्यालयामार्फत जिल्हांतर्गत २५ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या (Transfer) करण्यात आल्या आहेत. काही अधिकाऱ्यांनी राजकीय नेत्यांमार्फत फिल्डिंग लावूनही बदल्या न झाल्याने केलेली धावपळ वाया गेल्याची जोरदार चर्चा रंगली आहे. काही अधिकाऱ्यांना मनासारखी पोलिस ठाणे मिळाली आहेत, ते ताबडतोब बदलीच्या ठिकाणी हजर झाले आहेत. काहींना मात्र साईड पोस्टिंग मिळाली आहे, त्यामुळे अधिकाऱ्यांमध्ये ‘थोडी खुशी, थोडी गम’ असे वातावरण आहे. (Transfer of 25 police officers in Pune district)
पुणे जिल्हा ग्रामीण पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांनी गुरुवारी (ता. १९ जानेवारी) रात्री उशिरा हे आदेश पारित केले आहेत. त्यानुसार संबंधित अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. तसेच, शुक्रवारी (ता. २० जानेवारी) अनेक अधिकारी बदलीच्या ठिकाणी रुजूही झाले आहेत.
पूर्वीचे पोलिस ठाणे व पदस्थापना झालेले पोलिस ठाणे कंसात पोलीस निरीक्षक नावे अनुक्रमे : दिलीप शिशुपाल पवार आर्थिक गुन्हे शाखा (इंदापूर पोलिस ठाणे), नारायण विनायक पवार यवत पोलिस ठाणे, (जुन्नर पोलिस ठाणे), हेमंत गणपत शेडगे शिक्रापूर पोलिस ठाणे (यवत पोलिस ठाणे), राजकुमार बालाजी केंद्रे आर्थिक गुन्हे शाखा (खेड पोलिस ठाणे), विकास आयलप्पा जाधव जुन्नर पोलिस ठाणे (जिल्हा विशेष शाखा), प्रमोद अंबादास क्षीरसागर आळेफाटा पोलिस ठाणे (शिक्रापूर पोलिस ठाणे), यशवंत कृष्णा नलावडे सुरक्षा शाखा (आळेफाटा पोलिस ठाणे), संतोष दिनकर जाधव नियंत्रण कक्ष (सुरक्षा शाखा), विजयसिंह भगवानसिंह चौहान अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष (डायल 112), प्रभाकर नारायण मोरे (डायल 112) (बारामती तालुका पोलिस ठाणे), भाऊसाहेब नारायण पाटील जी. वी. शाखा तात्पुरता कार्यभार दौंड पोलिस ठाणे (दौंड पोलिस ठाणे).
सहाय्यक पोलिस निरीक्षक अनुक्रमे : नितीन लक्ष्मण नम हवेली पोलिस ठाणे (कामशेत पोलिस ठाणे), परशुराम हनुमंत कांबळे ओतूर पोलिस ठाणे (सायबर पोलिस ठाणे), महेश हनुमंत विधाते बारामती तालुका पोलिस ठाणे (अतिरिक्त पोलिस अधीक्षक बारामती यांचे वाचक), सोमनाथ विष्णू लांडे वडगाव निंबाळकर पोलिस ठाणे (एटीसी पुणे ग्रामीण), भालचंद्र दत्तात्रय शिंदे पौड पोलिस ठाणे (बारामती शहर पोलिस ठाणे), योगेश विश्वनाथ लंगुटे बारामती तालुका पोलिस ठाणे (इंदापूर पोलिस ठाणे), अर्जुन हरिबा मोहिते एटीसी पुणे ग्रामीण नियंत्रण कक्ष (पुणे ग्रामीण).
सचिन कोमलसिंग राऊळ लोणावळा ग्रामीण पोलिस ठाणे (उपविभागीय अधिकारी लोणावळा यांचे वाचक), देविदास हिरामण करंडे उपविभाग अधिकारी लोणावळा यांचे वाचक (लोणावळा ग्रामीण पोलिस ठाणे), सचिन विठ्ठलराव कांडगे सायबर पोलिस ठाणे (ओतूर पोलिस ठाणे), महादेव चंद्रकांत शेलार नियंत्रण कक्ष (स्थानिक गुन्हा शाखा), सचिन संतराम काळे स्थानिक गुन्हे शाखा (वडगाव निंबाळकर पोलिस ठाणे), विक्रम नारायण साळुंखे शिक्रापूर पोलिस ठाणे तात्पुरता कार्यभार वालचंद नगर पोलिस ठाणे (वालचंद नगर पोलिस ठाणे), वैशाली रावसाहेब पाटील नियंत्रण कक्ष (अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष)
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.