पुणे - नाशिक महामार्गावर वाहतुक कोंडीमुळे प्रवाशांचे हाल..

वाहतुक कोंडीचा (Traffic jam) ताण पोलीस यंत्रणेवर येत आहे.
Pune -Nashik Highway
Pune -Nashik HighwaySarkarnama

पुणे : विकेंडला बाहेर पडलेले नागरिक आणि शनिवारी (ता. 20 नोव्हेंबर) लग्नाची मोठी तिथी असल्याने नागरिक मोठ्या संख्येने घराबाहेर पडले. यामुळे पुणे-नाशिक (Pune -Nashik Highway) महामार्गावर चाकण राजगुरुनगरमध्ये मोठ्या वाहतुककोंडीचा (Traffic jam) सामना करावा लागला आहे. वाहनांच्या लांब रांगा लागल्याने महामार्गावर वाहतुककोंडी सोडवण्यासाठी पोलीस प्रशासनाची (Pimpri-Chinchwad Police) चांगलीच दमछाक झाली. येथील वाहतुक कोंडी सोडवण्यासाठी पोलीस निरिक्षक सतिष गुरव व कर्मचारी रात्रीपर्यंत प्रयत्न करत असल्याचे बघायला मिळाले.

Pune -Nashik Highway
राष्ट्रवादीचे राज्यमंत्री म्हणतात, मी फडणवीसांच्या ऋणात राहू इच्छितो!

राजगुरुनगर, मंचर, कळंब, नारायणगाव, आळेफाटा शहरात वाढत्या रहदारीमुळे पुणे - नाशिक महामार्गावर होणाऱ्या वाहतुककोंडीमुळे बायपास करण्यात आले आहेत. मात्र, नारायणगाव वगळता सर्व बायपासची कामे संथगतीने सुरू आहे. याचा नाहक त्रास स्थानिकांना व प्रवाशांना सहन करावे लागत आहे. येथील वाहतुककोंडीची समस्या नित्याचीच झाली आहे. अशात विकेंड आणि लगीन तिथी अल्यास वाहतुककोंडी समस्या वाढतच चालली आहे. या वाहतुक कोंडीचा ताण पोलीस यंत्रणेवर येत आहे. त्यामुळे बायपासची कामे युद्धपातळीवर व्हावीत अशी मागणी प्रवाश्यांकडुन सातत्यांने होत आहे.

Pune -Nashik Highway
मावळात भाजपला मोठे खिंडार; जयंत पाटलांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेश

हेही वाचा : शिवसेनेने पुढाकार घेतला अन् तासगाव आगारातून धावली लालपरी

सांगली : राज्य सरकारमध्ये एसटीचे विलीनीकरण करण्याच्या मागणीसाठी अनेक दिवसांपासून कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. सरकारकडून कामावर रुजू होण्याचे वारंवार आवाहन करून २५० आगारांमध्ये संप कायम आहे. त्यामुळे एसटीची सेवा सुरू करण्यासाठी शिवसेनेचे लोकप्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांना रस्त्यावर उतरण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. स्थानिक आगारांमध्ये जाऊन संपकऱ्यांशी आणि प्रशासनाशी चर्चा करण्याचेही सांगितले होते. त्यानुसार तासगाव आगारातून शिवसेना तासगावच्या वतीने एसटी कर्मचाऱ्यांची समजूत काढली व तासगाव सांगली, तासगाव मिरज, तासगाव विटा या मार्गावर नारळ फोडून एसटी सुरू केली. शिवसेना शेतकरी नेते संदीप गिड्डे पाटील यांच्या पुढाकाराने शिवसेनेचे शिष्टमंडळ सकाळी आंदोलन स्थळी पोहोचले.

प्रवाशांचे हाल आणि दैनंदिन तोटा वाढत असल्याने संप मोडण्यासाठी परिवहन मंत्री अनिल परब यांनी मोठ्या प्रमाणात हालचाली सुरु केल्या होत्या. संप मोडण्यासाठी शिवसेना स्टाईलचा वापर करणार असल्याचे सांगितले जात होते. त्याचा प्रत्यय आज आला. शिवसेनेच्या शिष्ट मंडळाने एसटी कर्मचाऱ्यांशी चर्चा केली. त्यानंतर तासगाव आगारातून एसटी धावली.

शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलनादरम्यान आत्महत्या केलेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीय या प्रति सहानुभूती व्यक्त केली. एसटी कर्मचाऱ्यांच्या रास्त मागण्यांसाठी शासन दरबारी पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. या कर्मचारी संपादरम्यान काही राजकीय पुढारी जाणीवपूर्वक राजकीय भांडवल करून दुकानदारी करीत आहेत. या मुळे कर्मचाऱ्यांची दिशाभूल होत असून कर्माचार्‍यांनी आडमुठे पणाची भुमिका न घेता कामावर हजर व्हावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

या वेळी शिवसेना शेतकरी प्रतिनिधी संदीप गिड्डे पाटील, तालुकाप्रमुख प्रदीप पाटील, तालुका संघटक जयवंत माळी, महिला आघाडी विधानसभा प्रमुख शोभाताई पिसाळ, युवासेना तालुकाप्रमुख नितीन राजमाने, महिला आघाडी तालुकाप्रमुख मनिषाताई पाटोळे, शहरप्रमुख विशाल शिंदे, युवासेना उपतालुकाप्रमुख अनिल दौंड. चिटनीस सुशांत यादव, प्रशांत गुंजले, प्रमोद सावंत, नितीन बाबर, तुषार धाबुगडे, केशव वाघमोडे, चिंतामणी यादव, आगारप्रमुख विरेंद्र होनराव, स्थानक प्रमुख सुनंदा देसाई, सहायक वाहतूक निरीक्षक राजू जाधव, सतिश पाटील, सुतार, फोंडे, सतिश पाटील, पोलिस निरीक्षक संजीव झाडे, पोलिस उपनिरीक्षक नामदेव तरटे यांचेसह एसटी चालक वाहक उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com