पुणे पालिकेत ‘भाजपा’च्या कारभाराचा आज शेवटचा दिवस;उद्यापासून सत्ता आयुक्तांच्या हाती

वेळापत्रकाप्रमाणे निवडणुका झाल्या असत्या तर आजअखेरपालिकेत नवी सत्ता अस्तित्वात आली असती.
Pmc Pune
Pmc PuneSarkarnama

पुणे : पुणे महापालिकेचा पाच वर्षांचा कार्यकाळ आज संपत आहे. परिणामी महापालिका पदाधिकाऱ्यांच्या कामकाजाचा आज शेवटचा दिवस असून उद्यापासून महापालिकेचा कारभार प्रशासकांच्या ताब्यात जाणार आहे. महापालिका आयुक्त विक्रमकुमार प्रशासक म्हणून काम पाहणार आहेत.

Pmc Pune
पवारसाहेब; पुण्याचा विकास करू शकतो हा भ्रम तुम्ही पन्नास वर्षे जोपासलात

वेळापत्रकाप्रमाणे निवडणुका झाल्या असत्या तर आजअखेरपालिकेत नवी महापालिका अस्तित्वात आली असती.राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार निवडणूक आयोगाने तीन सदस्यीय प्रभाग रचना तयार केली आहे.मात्र,‘ओबीसी’ आरक्षणामुळे निवडणुका लांबल्या.राज्य सरकारने गेल्या आठवड्यात विधी मंडळात कायदा करून निवडणुकांबाबतचे आधिकार स्वत:कडे घेतल्याने निवडणुका कधी होणार याबाबत अनिश्‍चितता निर्माण झाली आहे.

Pmc Pune
राज्य सरकार एकाच ‘बॉम्ब’ने चिडीचूप, अजून तर दुसरा फुटायचायं !

निवडणुका कधीही होऊ शकतात,असे सांगत पालकमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना निवडणुकीसाठी तयार राहण्याचे आवाहन रविवारी पुण्यात केले. राज्य सरकारने विधी मंडळात केलेल्या कायद्याला न्यायालयात कुणी आव्हान दिले तर राज्य सरकारने केलेला कायदा रद्द होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.ही भीती गृहीत धरूनच अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना निवडणुकीला तयार राहण्याच्या सूचना केल्या आहेत. न्यायालयाने राज्य सरकारचा कायदा रद्द ठरविल्यास ‘ओबीसी’ आरक्षणाशिवाय निवडणुका घेण्याशिवाय राज्य सरकारपुढे पर्याय राहणार नाही.

भारतीय जनता पार्टीच्यावतीने निवडणुकीची तयारी पूर्ण करण्यात आली आहे.मात्र, निवडणुका कधी होणार याबाबत अनिश्‍चितता आहे.पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते पुण्यातील मेट्रोसह विविध विकास कामांची उद्घाटने व भूमीपूजन करून पुणे भाजपाने निवडणूक प्रचाराची एक प्रकारे सुरवात केली आहे. मात्र, निवडणुका लांबल्याने भाजपासह सर्वपक्षीय इच्छुकांची अडचण झाली आहे. निवडणूक एप्रिल-मे महिन्यात होणार की दिवाळीपर्यंत लांबणार याबाबत नेमकी माहिती कुणालाच नाही. त्यामुळे नगरसेवक व इच्छुकांची मोठी अडचण जाली आहे.

Editedb By : Umesh Ghongade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com