MP Shrirang Barne Latest News
MP Shrirang Barne Latest News Sarkarnama

शिवसेना वाचविण्यासाठी ठाकरेंशी चर्चा करूनच घेतला निर्णय, बंडखोर खासदार बारणेंचा दावा

MP Shrirang Barne|Shivsena : शिंदे गटात गेल्यानंतर खासदार बारणे हे पहिल्यांदाच मतदारसंघात आले आहेत.

Shrirang Barne: शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह राज्यातील पक्षाच्या चाळीस आमदारांच्या बंडाला नंतर १२ खासदारांचाही पाठिंबा नुकताच मिळाला. त्यात समावेश असलेले मावळचे श्रीरंग बारणे (Shrirang Barne) हे संसद अधिवेशनाच्या पहिल्या आठवड्याचे कामकाज संपवून आज पिंपरी-चिंचवडमध्ये (Pimpri-Chinchwad) आले. तेव्हा पुणे विमानतळावर व नंतर थेरगाव येथील घरी त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. (MP Shrirang Barne Latest News)

MP Shrirang Barne Latest News
बारणे ज्या पक्षात जातात तो पक्ष संपतो, आता शिंदे गटही संपवून टाकतील

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात गेल्यानंतर खासदार बारणे हे पहिल्यांदाच मतदारसंघात आले. यावेळी त्यांच्यावर फुलांची उधळण विमानतळावर करण्यात आली. शिवसेना उपजिल्हाप्रमुख बाळासाहेब वाल्हेकर, पिंपरी विधानसभा प्रमुख राजेश वाबळे, रोहित माळी, राजेंद्र तरस, कष्टक-यांचे नेते बाबा कांबळे यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक, कार्यकर्ते, समर्थक यावेळी उपस्थित होते.

MP Shrirang Barne Latest News
आढळराव पाटील कोठूनही निवडणूक लढवा निष्ठावंत शिवसैनिक तुमचा पराभवच करेल...

"कोण आला रे कोण आला, शिवसेनेचा वाघ आला", "मावळ का नेता कैसा हो श्रीरंग आप्पा जैसा हो", ''आप्पा बारणे आगे बढो, हम तुम्हारे साथ है'', ''आम्ही फक्त आप्पा भक्त'', अशा घोषणा यावेळी त्यांनी दिल्या. माझा कोणताही घोटाळा नाही. त्यामुळे कुठल्याही यंत्रणेला घाबरत नाही. फक्त शिवसेना पक्ष वाचवा यासाठी आम्ही ही भूमिका घेतल्याचे बारणे यांनी यावेळी सांगितले.

MP Shrirang Barne Latest News
आता सुरत पॅटर्न पिंपरीत; असा निर्णय घेणारी राज्यातील पहिलीच पालिका

''सध्याची राजकीय परिस्थिती पाहता भाजप-शिवसेनेची युती झाली पाहिजे. या मताशी लोकसभेतील 12 खासदार सहमत आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत झालेल्या बैठकीत आम्ही ही भूमिका मांडली. 2019 च्या निवडणुकीत मतदारांनी भाजप-शिवसेना युतीला कौल दिला होता. नंतरच्या कालावधीत महाविकास आघाडी झाली. परंतू, राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा शिवसेनेला संपवू पाहत आहे. त्यादृष्टीकोनातून मुख्यमंत्री शिंदे यांनी शिवसेनेबाबत घेतलेली भूमिका आणि उचललेले पाऊल याचे आम्ही समर्थन केले. बाळासाहेबांच्या विचाराची शिवसेना वाचविण्यासाठी आणि हिंदुत्वाचा विचार जागृत करण्याकरिता मुख्यमंत्री शिंदे यांनी उचललेल्या पावलाला शिवसैनिकांनी, नेत्यांनी समर्थन दिले आहे'', असे ते म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com