Laxman Jagtap News : पुन्हा निवडून येऊ की नाही? गॉडफादर लक्ष्मण जगतापांच्या निधनामुळे भाजपच्या नगरसेवकांना धास्ती

गतवेळी जगतापांच्या चिंचवड मतदारसंघातून पक्षाचे सर्वाधिक म्हणजे ३७ नगरसेवक निवडून आले होते.
Laxman Jagtap
Laxman JagtapSarkarnama

पिंपरी : चिंचवडचे (Chinchwad) भाजप (BJP) आमदार आणि पक्षाचे माजी शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप (mla Laxman Jagtap) यांचे नुकतेच (ता. ३ जानेवारी) निधन झाल्याने जगताप कुटुंबांची न भरून येणारी हानी झाली आहे. तसेच, त्याचा मोठा फटका भाजपलाही बसला आहे. आगामी पिंपरी-चिंचवड महापालिका (Corporation) निवडणुकीत (Election) पुन्हा कमळ फुलविण्यासाठी भाजपला अधिकची मेहनत घ्यावी लागणार आहे. (To be re-elected or not? BJP corporators are worried about death of Godfather Laxman Jagtap)

पिंपरी पालिकेत गतवेळी २०१७ मध्ये भाजप प्रथमच सत्तेत आला. त्यांचे १२८ पैकी ७७ नगरसेवक निवडून आले होते. त्यामुळे हुरूप वाढलेल्या व शहरातील तीनपैकी दोन आमदार असलेल्या भाजपने २०२२ च्या पालिका निवडणुकीत शंभर प्लसचा नारा दिला होता. (दरम्यान, ओबीसी आरक्षणासह इतर कारणामुळे ही निवडणूक पुढे गेली आहे. ती यावर्षी होण्याची शक्यता आहे) मात्र, गेल्या निवडणुकीत सर्वाधिक नगरसेवक निवडून आणलेले व पालिकेत प्रथमच कमळ फुलवण्यात सिंहाचा वाटा असलेले आमदार जगताप यांच्या निधनाने ‘शंभर प्लस’चा नारा प्रत्यक्षात उतरविण्यासाठी भाजपला मेहनत घ्यावी लागणार आहे. कारण गतवेळी जगतापांच्या चिंचवड मतदारसंघातून पक्षाचे सर्वाधिक म्हणजे ३७ नगरसेवक निवडून आले होते. तर, आमदार महेश लांडगे यांच्या भोसरी मतदारसंघातून ३३ नगरसेवक निवडून आले होते. राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडे यांच्या पिंपरी मतदारसंघातून भाजपचे सर्वात कमी म्हणजे सात नगरसेवक निवडून आले होते.

Laxman Jagtap
Congress News : मल्लिकार्जून खर्गे यांनी महाराष्ट्रातील या नेत्यांवर सोपवली मोठी जबाबदारी

चिंचवडमधील अनेक नगरसेवक हे भाजपपेक्षा लक्ष्मण जगताप यांच्या करिष्म्यामुळे निवडून आले होते. टेल्को कंपनीच्या कामगारालाही त्यांनी नगरसेवक केले होते, एवढी त्यांची जादू २०१७ ला चालली होती. आता तीच आगामी पालिका निवडणुकीत नसणार आहे, त्यामुळे फक्त जगतापांमुळे २०१७ ला निवडून आलेले चिंचवडमधील काही नगरसेवक आता आपण पुन्हा नगरसेवक होऊ की नाही, या चिंतेने धास्तावले आहेत.

Laxman Jagtap
Karnataka : विधानसभेत साडेदहा लाखांची रोकड नेण्याचा प्रयत्न : एकाला अटक

भाजपअगोदर पालिकेत १५ वर्षे सत्तेत असलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसने पुन्हा सत्तेत येण्यासाठी कंबर कसली आहे. राष्ट्रवादीचे नेते एकवटून कामाला लागल्याचे दिसत आहे. दरम्यान, केंद्रानंतर राज्यातही सरकार आल्याची बाब भाजपच्या पथ्यावर पडणारी आहे. त्याचवेळी पालिकेत सत्तेत येण्याची राष्ट्रवादीच वाट मात्र त्यामुळे काहीशी बिकट झाली आहे.

Laxman Jagtap
Tanuja Bhoir : शिवसेनेच्या बालेकिल्ल्यातून बड्या नेत्याची कन्या भाजपच्या वाटेवर ? ; 'या' फोटोमुळे चर्चांना उधाण

तीनवेळा विधानसभा, एकदा विधान परिषद असे चारदा आमदार राहिलेले लक्ष्मणभाऊंसारखा मंत्रिपदाचा दावेदार हिरावला गेल्याने शहर मंत्रिपदापासून पुन्हा वंचित राहिले आहे. त्यांची उणीव आमदार लांडगे यांना आता भरून काढावी लागणार आहे. तर, चिंचवडमधून पुन्हा सर्वाधिक नगरसेवक निवडून आणण्याचे शिवधनुष्य लक्ष्मणभाऊ यांचे बंधू शंकर जगताप यांना पेलावे लागणार आहे. कारण तेच भाजपचे चिंचवड विधानसभा प्रमुख आहेत. लक्ष्मण जगताप यांची पोकळी शंकर जगताप यांनाच भरून काढावी लागणार आहे. बहूधा तेच भाजपचे चिंचवडच्या पोटनिवडणुकीत उमेदवार राहण्याची दाट शक्यता आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com