पुण्यात रंगणार महाराष्ट्र केसरीचा थरार : मुरलीधर मोहोळांच्या संस्कृती प्रतिष्ठानला मान!

Maharastra kesari : ३३ जिल्ह्यातील ४५ तालीम संघाच्या ९०० मल्लांचा सहभाग..
Maharastra kesari
Maharastra kesariSarkarnama

पुणे : महाराष्ट्रातील सर्वात प्रतिष्ठेची आणि कुस्तीचा कुंभमेळा असणाऱ्या 'महाराष्ट्र केसरी' (Maharastra kesari) स्पर्धेचा थरार वर्षाखेरीस डिसेंबरमध्ये रंगणार आहे. यंदा या स्पर्धेच्या आयोजनाची संधी संस्कृती प्रतिष्ठानला मिळाली असल्याचा आनंद असून, कोथरूडमध्ये ही स्पर्धा भव्य दिव्य स्वरूपात करण्याचा मानस आहे, अशी माहिती 'महाराष्ट्र केसरी' स्पर्धेचे मुख्य संयोजक व संस्कृती प्रतिष्ठानचे संस्थापक व पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी पत्रकार परिषदेत दिली.(Latest Marathi News)

यावेळी माजी खासदार अशोक मोहोळ, पिंपरी चिंचवड कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष पै. हनुमंत गावडे, पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष पै. संदीप भोंडवे, पुणे शहर राष्ट्रीय तालीम संघाचे अध्यक्ष पै. योगेश दोडके, पुणे शहर राष्ट्रीय तालीम संघाचे विश्वस्त पै. तात्यासाहेब भिंताडे, पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्ष विलास कथुरे आणि पदाधिकारी, कुस्तीगीर आदी उपस्थित होते.

Maharastra kesari
मुरलीधर मोहोळांवर भाजपने सोपवली मोठी जबाबदारी!

मुरलीधर मोहोळ म्हणाले, "मामासाहेब मोहोळ यांच्या संकल्पनेतून आणि दूरदर्शी विचारातून ‘महाराष्ट्र केसरी’ही स्पर्धा सुरु झाली आणि आज मोठ्या शिखरावर पोहोचली. आम्हा मोहोळ कुटुंबियांकडे या स्पर्धेची जबाबदारी आली, ही निखळ समाधान देणारी बाब आहे. ज्या मामासाहेब मोहोळ यांनी या स्पर्धेची मुहूर्तमेढ रोवली, त्यांच्या स्मृतींना अभिवादन करण्याचा, उजाळा देणारी ही स्पर्धा ठरेल. काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या समितीचे अध्यक्ष संजय सिंग यांच्याकडून महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या आयोजनाचे पत्र स्विकारले आहे. वर्षाअखेरीस या कुस्ती स्पर्धेचे आयोजन केले जाणार आहे. कुस्ती क्षेत्रातील मान्यवर, तसेच कुस्तीप्रेमींना निमंत्रित करण्यात येणार आहे."

"सलग सहा दिवस या स्पर्धेचा थरार रंगणार असून, राज्यभरातील मल्ल सहभागी होणार आहेत. ३३ जिल्ह्यातील आणि ११ महापालिकामधील सुमारे ४५ तालीम संघाच्या ९०० मल्ल या स्पर्धेत सहभागी होत आहेत. यासह नामांकित ४० मल्लही सहभागी होणार आहेत," असे मुरलीधर मोहोळ यांनी नमूद केले. यावेळी अशोक मोहोळ म्हणाले, "मामासाहेब मोहोळ यांच्या गावात मोहोळ कुटुंबीय ही स्पर्धा भरवत आहेत, ही आनंदाची बाब आह. तसेच गेली ३८ वर्षे 'महाराष्ट्र केसरी'ची गदा देण्याचे भाग्य आम्हाला लाभत आहे. जो महाराष्ट्र केसरीठरतो, त्याच्या हातात मानाची गदा देताना समाधान वाटते."

यंदा विविध दहा वजनी गटात, माती आणि गादी विभागात कुस्ती होतील. ९०० कुस्तीगीर, ९० व्यवस्थापक, ९० मार्गदर्शक, १२५ तांत्रिक अधिकारी, ९० पदाधिकारी सहभागी होणार आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com