फोटोशूटसाठी गेलेल्या तीन तरुणांचा तलावात बुडून मृत्यू

दौंड पोलिसांना या बाबत माहिती दिल्यानंतर पोलिसांनी मासेमारी करणाऱ्या तरुणांच्या मदतीने शोध मोहिम सुरू केली.
Asrar Qazi-Kareem Qazi-Atik Shaikh
Asrar Qazi-Kareem Qazi-Atik Shaikhsarkarnama

दौंड (जि. पुणे) : दौंड (daund) नगरपालिकेच्या साठवण तलावात बुडून तीन तरुणांचा मृत्यू झाला आहे. साठवण तलाव व परिसरात फोटोशूट करण्यासाठी हे तरुण गेले होते. (Three youths drowned in a lake while going for a photoshoot in Daund)

दौंड पोलिस ठाण्याचे निरीक्षक विनोद घुगे यांनी आज (ता. ७ मार्च) या बाबत माहिती दिली. असरार अब्दूल अलीम काझी (वय २१), करीम अब्दूल हादी काझी (वय २०) आणि अतिक उझजमा फरीद शेख (वय २०, तिघे रा. नवगिरे वस्ती, नगर मोरी, दौंड) अशी त्यांची नावे आहेत. हे तिघेही रविवारी (ता. ६ मार्च) दुपारी चारच्या सुमारास एका दुचाकीवरून दौंड-कुरकुंभ राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या नगरपालिका साठवण तलाव परिसरात फोटोशूट करून पोहण्यासाठी गेले होते. रात्री आठ वाजले तरी तिघे घरी परत न आल्याने कुटुंबीयांनी शोध घेतला असता त्यांना तिघे तलावावर पोहण्यासाठी गेल्याची माहिती मिळाली.

Asrar Qazi-Kareem Qazi-Atik Shaikh
सभासद ज्यांच्या हाती ‘विठ्ठल’ देतील, त्यांनाच मदत करणार : पवारांनी केली भूमिका स्पष्ट!

नातेवाईक व मित्रमंडळींनी साठवण तलाव परिसरात पाहणी केली असता तलावातील विहिरीच्या कडेला त्यांची दुचाकी, बॅग व कपडे आढळून आले. दौंड पोलिसांना या बाबत माहिती दिल्यानंतर पोलिसांनी मासेमारी करणाऱ्या तरुणांच्या मदतीने शोध मोहिम सुरू केली. मासेमारी करणाऱ्यांनी पाण्यात गाळात अडकलेले त्यांचे मृतदेह रविवारी मध्यरात्री पावणे एकच्या दरम्यान बाहेर काढले. त्यानंतर तिघांच्या मृतदेहांचे दौंड उपजिल्हा रूग्णालयात विच्छेदन करण्यात आले.

Asrar Qazi-Kareem Qazi-Atik Shaikh
राष्ट्रवादीचे माजी आमदार रमेश कदमांची शिवीगाळ प्रकरणातून दोषमुक्तता

मृत असरार व करीम काझी हे सख्खे चुलतभाऊ असून रेल्वे सुरक्षा दलाचे सेवानिवृत्त पोलिस अधिकारी एस. काझी यांचे नातू होते. अतिक शेख हा काझी यांचा शेजारी राहणारा मित्र होता. असरार हा कला शाखेचा पदवीधर असून नोकरी करीत होता. तर करीम आणि अतिक हे पुणे येथील महाविद्यालयात संगणक विज्ञान शाखेचे शिक्षण घेत होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com