Presidential Election: राष्ट्रपतीपदाच्या निवडणूकीत महाविकास आघाडीतील 'चार' मते फुटली...

Presidential Election| Draupadi Murmu| द्रौपदी मुर्मू यांना 812 मतं तर यशवंत सिन्हा यांना 521 मतं मिळाली
Presidential Election, Draupadi Murmu Latest News
Presidential Election, Draupadi Murmu Latest Newssarkarnama

पुणे : देशाचे 15 वे राष्ट्रपती म्हणून एनडीएकडून (NDA) राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार असलेल्या द्रौपदी मुर्मू यांचा विजय झाला. त्यांनी यशवंत सिन्हा यांचा मोठ्या फरकाने पराभव केला. द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) यांना 812 मतं तर यशवंत सिन्हा यांना 521 मतं मिळाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रपती पदाच्या निवडणूकीत महाराष्ट्रातून 200 मते मिळणार असल्याचा दावा केला होता. मात्र हा दावा फेल ठरल्याचे दिसत आहे. (Presidential Election latest news update)

राष्ट्रपतीपदाच्या निवडणूकीतील आकडेवारी पाहता महाविकास आघाडीची केवळ तीन मते फुटल्याची बाब समोर आली आहे. भाजप, शिवसेना आणि शिंदे गटाने द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा जाहीर केला होता. या सर्वांची बेरीज १७८ होते. त्यामुळे फुटलेली ही तीन मते कोणाची, असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे. यात कॉंग्रेस-राष्ट्रवादीची तीन मते फुटली असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Presidential Election, Draupadi Murmu Latest News
Mahesh Zagade Exclusive | बांठिया आयोगाचे सदस्य महेश झगडे यांची विशेष मुलाखत

राष्ट्रपती पदाच्या निवडणूकीत देशभरातील जवळपास १२६ आमदारांनी द्रौपदी मुर्मू यांच्यासाठी क्रॉसवोटिंग केल्याची माहिती समोर आली आहे. ही आकडेवारी पाहता महाष्ट्रातून किती क्रॉसवोटिंग झाले, याचीही सर्वांना उत्सुकता आहे. राष्ट्रपती पदाच्या निवडणूकीत कोणताही व्हीप काढला जात नाही. आमदारांना स्वतंत्रपणे मतदान करण्याच हक्क असतो. पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रपती पदाच्या निवडणूकीत 200 पेक्षा मते मिळणार असल्याचा दावा केला होता. पण मतदानाची आकडेवारी पाहिली तर कॉग्रेस-राष्ट्रवादीची जास्तीत जास्त तीन मते फुटल्याची शक्यता आहे.

भाजप आणि त्यांचे मित्रपक्ष यांची मिळून 111 आमदार शिवसेनेचे 15 आणि शिंदे गटाचे 52 आमदार, यासर्वांची बेरीज 178 इतकी होते. पण या निवडणूकीत द्रौपदी मुर्मू यांना 181 मते मिळाली, म्हणजेच द्रौपदी मुर्मू यांना या निवडणूकीत तीन अतिरिक्त मतं मिळाल्याचे दिसते. ही फुटलेली तीन मते कॉंग्रेस राष्ट्रवादीकडून आल्याचे दिसत आहे. पण हा आकडा तुलनेने कमी असल्याचेही सांगण्यात येत आहे. पण गेल्यावेळी म्हणजे रामनाथ कोविंद यांच्या मतदानावेळी आठ मतं फुटली होती. त्या तुलनेत यावेळी कमी फुट झाल्याचं पाहायला मिळते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in