तुषार हंबीर हल्ला प्रकरणात तीन पोलीस निलंबित

Tushar Hambir : ससून रुग्णालयात हंबीर याच्यावर चौघांकडून हल्ला करण्यात आला होता.
police
policesarkarnama

पुणे : महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी प्रतिबंधित कायद्यानुसार (मोका) कारवाई झालेला व ससून रूग्णालयात भरती असलेला आरोपी हिंदुराष्ट्र संघटनेचा अध्यक्ष तुषार हंबीर याच्यावर खुनी हल्ला करण्याच्या प्रकरणातील मुख्य सूत्रधारासह पोलिसांनी आठ आरोपींना अटक केली आहे. गुन्हे शाखेच्या युनीट पाचच्या पथकाने, उत्तमनगर परिसरात ही कारवाई केली. 5 सप्टेंबरला रात्रीच्या सुमारास पुण्यातील ससून रुग्णालयातील इन्फोसिस जनरल वार्डमध्ये हंबीर याच्यावर चौघांकडून प्राणघातक हल्ला करण्यात आला होता.

मुख्य सुत्रधार प्रकाश उर्फ वैष्णव रणछोडदास दिवाकर ( वय 26 रा. भिमनगर, उत्तमनगर ,पुणे) आणि परवेज उर्फ साहिल हैदर अली इनामदार (वय 21 रा. ऊरळी-देवाची,पुणे) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. यांच्यासह आठ जणांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान ससून रुग्णालयात तुषार हंबीरच्या बंदोबस्तासाठी नेमलेले पोलीस शिपाई पांडुरंग भगवान कदम, राहुल नंदू माळी आणि सिताराम अहिलू कोकाटे या पोलीस कर्मचाऱ्यांवर पोलीस उपायुक्त विवेक पाटील यांनी निलंबनाची कारवाई केली.

तुषार हंबीर हल्ला प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत आठ आरोपींना अटक केले आहे. अटक केलेल्या आरोपींची वेगवेगळ्या कारागृहात रवानगी केली आहे. खून आणि खूनाच्या अनेक गुन्ह्यात तुषार हंबीर हा सध्या येरवडा कारागृहात आहे. लोणी काळभोर पोलीस ठाण्यातंर्गत दाखल गुन्ह्यात हिंदुराष्ट्र सेनेचा तुषार हंबीर याच्यावर महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी प्रतिबंधित कायद्याअंतर्गत (मोका) यापूर्वीच कारवाई झाली होती. दरम्यान, हंबीर याला चालता येत नसल्याने वैद्यकीय उपचारांसाठी 28 ऑगस्ट पासून पुण्यातील ससून रुग्णालयात भरती करण्यात आले होते.

police
Grampanchayat Result : पुणे जिल्ह्यातील ६१ पैकी ४६ ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीचे वर्चस्व

पोलिसांच्या माहितीनुसार, तुषार हंबीर हा हिंदू राष्ट्र सेनेचा कार्यकर्ता आहे. लोणी काळभोर पोलिस ठाण्यात 2016 मध्ये दाखल झालेल्या मोक्काच्या गुन्ह्यात तो आरोपी आहे. हंबीरला हाडांचा व स्नायू दुखण्याचा त्रास सतत होत असतो. यासाठी त्याला रूग्णालयात आणले होते. रूग्णालयात असताना रात्री हंबीरवर हल्ला झाला होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in