PCMC ACB Trap News : आठ दिवसांत पिंपरीत 'एसीबी'चा पुन्हा ट्रॅप, दीड लाखाची लाखाची लाच घेताना एपीआयसह तिघांना पकडले

PCMC News : उद्योगनगरी पिंपरी-चिंचवडमध्ये लाचखोरी वाढतच चालली आहे.
ACB trap
ACB trapSarkarnama

Pimpri-Chinchwad News : उद्योगनगरी पिंपरी-चिंचवडमध्ये (Pimpri-Chinchwad) लाचखोरी वाढतच चालली आहे. आठ दिवसांपूर्वी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या उद्यान विभागातील सहाय्यक निरीक्षक किरण अर्जून मांजरे (वय ४६) याला त्याच्या कार्यालयातच १७ हजार रुपयांची लाच घेताना पकडण्यात आले होते. त्यानंतर आज शहरात 'एसीबी'चा दुसरा ट्रॅप झाला.

गेल्या तीन महिन्यात उद्योगनगरीत झालेला हा तिसरा ट्रॅप आहे. यापूर्वीच्या दोन प्रकरणात पालिकेचे लाचखोर कर्मचारी पकडले गेले. तर, आज पोलीस खात्याचा नंबर लागला. धक्कादायक बाब म्हणजे आजच्या लाचेच्या घटनेतील दीड लाखाची लाच ही एका महिलेकडून त्यांच्या निगडी-प्राधिकरणातील घरी जाऊन घेण्याचे धाडस करण्यात आले.

ACB trap
Devendra Fadnavis : मंत्रिमंडळ विस्ताराची पुन्हा चर्चा; उपमुख्यमंत्री फडणवीस अमित शाहांच्या भेटीला

त्यातून लाचखोर किती निर्ढावले आहेत, याचा प्रत्यय येत आहे. सुदेश शिवाजी नवले (वय 43 वर्ष, रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड) या पोलिसांच्या पंटरने 48 वर्षीय महिलेकडून निगडी पोलीस (Police) ठाण्यातील एपीआय अमोल प्रकाश कोरडे, पोलीस शिपाई सागर तुकाराम शेळके यांच्यासाठी त्यांच्या मागणीवरून ही लाच घेतली. या तिघांनाही एसीबीने ताब्यात घेतले आहे.

एसीबीकडील तक्रारदार महिलेने त्यांच्या ओळखीच्या व्यक्तीस बँकेमधुन कर्ज काढून पैसे दिले होते. या कर्जाचे हप्ते न भरल्यामुळे तक्रारदार यांनी उसने पैसे दिलेल्या ओळखीच्या व्यक्तीकडे दिलेल्या पैशाची मागणी केली. त्यावर त्यांनी पैसे दिलेल्या महिलेविरुद्धच खंडणीची तक्रार निगडी पोलीस ठाण्यात दिली. त्याची चौकशी एपीआय कोरडेंकडे होती. त्यात त्यांनी व शेळकेने या महिलेविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल न करण्यासाठी दीड लाख रुपये मागितले. ते घेताना नवलेला आज पकडण्यात आले.

ACB trap
K. Chandrasekhar Rao News : के. चंद्रशेखर रावांचा धडाका; कुणाला देणार दणका; प्रमुख पक्षांची चिंता वाढली...

नंतर या दोघा पोलिसांनाही ताब्यात घेण्यात आले. पुणे (Pune) एसीबी युनीटच्या डीवायएसपी माधुरी भोसले, पीआय प्रविण निंबाळकर, पोलीस हवालदार नवनाथ वाळके, पोलीस शिपाई सौरभ महाशब्दे, शिल्पा तुपे, चालक पोलीस शिपाई पांडुरंग माळी या पथकाने ही सापळा कारवाई एसपी अमोल तांबे आणि अॅडिनशल एसपी शीतल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com