भाऊबीजेच्या दिवशी पत्नीच्या मित्राला दहाव्या मजल्यावरून फेकले...

Crime : गुन्हेगारांनी शहर पोलिसांना तीन खूनांची कटू भेट दिली.
Crime News, Pimpri-Chinchwad
Crime News, Pimpri-Chinchwad Sarkarnama

पिंपरी : दिवाळी पाडवा तथा भाऊबीजेच्या दिवशी बहिण भाऊ एकमेकांना भेटी देऊन हा सण गोड करतात. मात्र, पिंपरी-चिंचवडमधील गुन्हेगारांनी शहर पोलिसांना तीन खूनांची कटू भेट दिली.

त्यामुळे शहर दिवाळीत हादरून गेले. त्यातील एका घटनेत, तर आय़टी कंपनीत काम करणाऱ्या तरुणाने आपल्या पत्नीच्या मित्राला दहाव्या मजल्यावरून खाली फेकून त्याचा खून केला. दुसऱ्या प्रकारातील खूनाच्या गुन्ह्यात तीन अल्पवयीन हल्लेखोरांना ताब्यात घेण्यात आल्याने अल्पवयीन गुन्हेगारीचा मुद्दा उद्योगनगरीच्या आयुक्तालयात पुन्हा ऐरणीवर आला आहे. (Crime News, Pimpri-Chinchwad )

Crime News, Pimpri-Chinchwad
Amit Shah : भर कार्यक्रमात अमित शहांनी हरियाणाच्या मंत्र्याला फटकारलं ; व्हिडिओ व्हायरल

तीनपैकी दोन खून हे भाऊबीजेच्या दिवशी म्हणजे परवा (ता.२६ ऑक्टोबर) झाले. त्याबाबत काल (ता.२७ ऑक्टोबर) गुन्हे नोंद होऊन पोलिस बुलेटिनला त्याबाबत आज (ता.२८ ऑक्टोबर) माहिती देण्यात आली. तिसरा खून हा भाऊबीजेच्या आदल्या दिवशी झाला. तीनपैकी दोन खून भोसरी एमआयडीसी या एकाच पोलिस ठाण्याच्या हद्दीत २४ तासात झाल्याने या ना त्या कारणामुळे चर्चेत येणारे हे पोलीस ठाणे या खून सत्रामुळे पुन्हा चर्चेत आले. तेथील दोनपैकी एक खून, तर फक्त संशयातून झाला आहे.

भोसरी एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत मोशी येथील वूडस व्हिला फेज १ या आलिशान हौसिंग सोसायटीत निलेश अशोक जोर्वेकर (वय ३७) या आय़टी उद्योगात काम करणार्याचा भाऊबीजेला खून झाला. ते आपल्या मैत्रिणीला भेटायला सदर सोसायटीत गेले होते.

Crime News, Pimpri-Chinchwad
मनसे आमदारानं मुख्यमंत्री शिंदेंना करुन दिली आठवण; म्हणाले, आता तरी मुहूर्ताची..

त्यावेळी मैत्रिणीचा पती पंकज शिंदेंने पत्नीच्या चारित्र्यावरून अशोकशी वाद घालून त्यांच्या पोटात धारदार हत्यार खुपसले. नंतर त्यांना दहाव्या मजल्यावरून खाली फेकून दिले. याच ठाण्याच्या हद्दीत दुसरा खून पवन लष्करे या सराईत गुंडाचा २५ तारखेच्या रात्री झाला. त्याच्यावर कोयता आणि पायघन या हत्यारांनी सपासप वार १२ जणांच्या टोळक्याने केले. त्यात तीन अल्पवयीन असल्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र निकाळजे यांनी `सरकारनामा`ला सांगितले.

भाऊबीजेला दुसरा खूनाचा गुन्हा तळेगाव दाभाडे येथे घडला. त्यात देवराम भदरू पतलावत (वय ४०, रा. भोई आळी, तळेगाव दाभाडे, ता. मावळ) याने आपल्या पत्नीची मान मुरगाळून तिचा जीव घेतला. नंतर तो पळून गेला.

दरम्यान, दोन दिवसांतील व त्यातही दिवाळीच्या सणात झालेल्या या तीन खूनांनी शहर हादरून गेले. त्यामुळे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना त्याची दखल घ्यावी लागली आहे. दुसरीकडे लुटमार आणि विनयभंगाचे गुन्ह्यांचे सत्र शहरात सुरुच आहे. गेल्या दोन दिवसांत विनयभंगाचे दोन गुन्हे नोंदले गेले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com