पुण्यात एका दिवसात बलात्काराच्या तीन घटना !

बलात्काराच्या घटनांनी पुणे शहर पुन्हा एकदा हादरलं आहे.
पुण्यात एका दिवसात बलात्काराच्या तीन घटना !
pune crime.png

पुणे : बलात्काराच्या घटनांनी पुणे शहर पुन्हा एकदा हादरलं आहे. एकाच दिवशी वेगवेगळ्या भागात बलात्काराच्या तीन घटना घडल्या असून नऊ, १३ व २१ वर्षांच्या मुलींवर बलात्कार झाले आहेत.तीन्ही प्रकरणात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.या घटनांनी पुण्यात महिला खरोखरीच सुरक्षित आहेत का ? असा प्रश्‍न उभा राहिला आहे.(Three incidents of rape in one day in Pune)  

सिंहगड रोड पोलीस ठाण्यात २१ वर्षीय तरूणीने पोलिसांकडे तक्रार दिली आहे. शेजारी राहणाऱ्या व्यक्तीने जबरदस्तीने बलात्कार केला. प्रतिक्रार केला असता झाडूने मारहाण करण्यात आली. शिवाय हा प्रकार कुणाला  सांगितल्यास भावाला जिवे मारण्याची धमकी दिली आहे. या प्रकरणी पोलिसांनी राहूल जनार्दन खंडारे (वय ३९) यास अटक केली आहे.

दुसरी घटना हडपसर परिसरात घडली आहे. आरोपी कुणाला पटेल (वय २०) याने नऊ वर्षाच्या मुलीसोबत मैत्री करून गैरफायदा घेत तिच्याशी जबरदस्तीने शरीरसंबंध ठेवले.हा सर्व प्रकार मुलीच्या आईच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली आहे.या प्रकरणी पटेल याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

तिसरी घटना आणखी भयंकर आहे. ही घटना कोंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असून बापानेच १३ वर्षाच्या मुलीवर गेल्या सात वर्षापासून वारंवार बलात्कार केल्याचे स्पष्ट झाले आहे. या नराधम बापाला पोलिसांनी अटक कली आहे.  

Edited By : Umesh Ghongade
 

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in