BJP Appointed District Incharge : पुणे शहर-पिंपरी अन् जिल्ह्यात भाजपचे तब्बल तीन प्रभारी; साबळे, पांडे आणि डहाळेंकडे जबाबदारी

Chandrashekhar Bawankule News : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फिरवली भाकरी
Amar Sable, Rajesh Pandey, Varsha Dahale
Amar Sable, Rajesh Pandey, Varsha DahaleSarkarnama

District Incharge of BJP : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मे महिन्याच्या सुरुवातीलाच त्यांची नवी टीम जाहीर केली होती. यात पुण्यातून शहर भाजपचे संघटन सरचिटणीस राजेश पांडे यांना उपाध्यक्षपदी बढती दिली. त्यानुसार राजेश पांडे यांच्याकडे आता पुणे ग्रामीण आणि पुणे मावळचे प्रभारी म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. तर पुणे शहराचे प्रभारी अमर साबळे असतील. वर्षा डहाळे यांच्याकडे पिंपरी-चिंचवड शहराची जबाबदारी देण्यात आली आहे.

महाराष्ट्र भाजप संघटन विस्तार व पक्ष बळकटीसाठी विभाग प्रभारी व जिल्हा प्रभारी यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. प्रदेश सरचिटणीस यांना संबंधित विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे. प्रदेश उपाध्यक्ष व चिटणीस यांना संघटनात्मक जिल्हा प्रभारी म्हणून नेमण्यात आले आहे. यामध्ये १६ उपाध्यक्ष, ६ सरचिटणीस, १५ चिटणीस यासह कोषाध्यक्ष, संघटन मंत्री यांचा समावेश आहे. दरम्यान, प्रदेशाध्यक्ष बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी गुरुवारी (ता. २४) विभाग प्रभारी आणि जिल्हा प्रभारी यांच्या नावांची यादी जाहीर केली आहे. त्यांच्याकडे राज्यातील विविध लोकसभा मतदारसंघाची जाबाबदारी देण्यात आली आहे.

Amar Sable, Rajesh Pandey, Varsha Dahale
Mahavikas Aghadi : लोकसभेसाठी ठाकरेंच्या २३ जागांचा दावा महाविकास आघाडीचं दुखणं ठरणार?

यापूर्वी भाजपकडून पुणे ग्रामीण आणि मावळ विभागासाठी एकच जिल्हाध्यक्ष पद नेमले जात होते. आता भाजपने पुणे (Pune) जिल्ह्याचे दोन विभाग करणार आहे. यात उत्तर पुणे आणि दक्षिण पुणे जिल्हा असे विभाग असणार आहेत. काही दिवसांतच या दोन्ही जिल्हाध्यक्षांची निवड केली जाणार आहे. उत्तर जिल्ह्यात आंबेगाव, जुन्नर, खेड, शिरूर, हवेली, मावळ या तालुक्यांचा समावेश आहे. तर दक्षिण विभागात मुळशी, भोर, वेल्हे, पुरंदर, दौंड, बारामती (Baramati) आणि इंदापूर या तालुके समाविष्ट केले आहेत.

दरम्यान, गुरुवारी पुणे ग्रामीण आणि पुणे मावळ या विभागांची जबाबदारी राजेश पांडे यांच्याकडे देण्यात आली आहे. प्रभारी म्हणून पांडे यांना आता बारामती, शिरूर व मावळ लोकसभा मतदारसंघात भाजपची ताकद वाढविण्याबाबत काम करावे लागणार आहे. भाजप नेते अमर साबळे यांच्याकडे पुणे शहर आणि सातारा जिल्ह्याचे प्रभारी असतील. तर पिंपरी-चिंचवड शहराचे प्रभारी म्हणून वर्षा डहाळे यांच्याकडे भाजपने जबाबदारी दिली आहे. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या (Election) पार्श्वभूमीवर राज्यात भाजपने भाकरी फिरविली आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com