'सीतारमण यांना बारामती 'मॉडेल' पाहण्यासाठी तीन दिवस पुरणार नाहीत!'

Supriya Sule : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा बारामती दौरा होणार आहे.
Supriya Sule, Nirmala Sitharaman
Supriya Sule, Nirmala Sitharamansarkarnama

पुणे : भाजपने बारामती (Baramati) लोकसभा मतदारसंघावर लक्ष केंद्रित करण्याचे निश्चित केले आहे. याबाबतची रणनीती आखण्याच्या दृष्टिकोनातून नुकताच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांचा बारामती दौऱ्याची चर्चा होत होती. आगामी काळात केंद्रिय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitaraman) यांचाही बारामती दौरा होणार आहे. आता याच मुद्द्यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुप्रिया सुळे यांनी निर्मला सीतारामन यांच्यावर टीका केली आहे. 'अनेक भाजपचे नेते हे बारामती फिरून गेले आहेत, सीतारामन यांनीही यावं, बारामतीचा विकास पाहण्यासाठी त्यांना तीन दिवस पुरणार नाहीत,' असा टोला सुप्रिया सुळे यांनी लगावला आहे.

आज सुप्रिया सुळे फुरसुंगी या ठिकाणी आल्या होत्या, यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. सुप्रिया सुळे यांनी बारामती लोकसभा मतदारसंघाच्या मुद्दयावरून निर्मला सीतारामन यांना टोला लगावला आहे. 'निर्मला सीतारामन यांचं बारामतीमध्ये स्वागत आहे, आम्हीही स्वागत साठी तयारआहोत. या भागाची काही माहिती पाहिजे असेल तर ती आम्ही द्यायला तयार आहोत, बारामती हे मॉडेल आहे. भाजपचे अनेक नेते या ठिकाणी फिरून गेले आहेत, बारामतीचा विकास पाहण्यासाठी त्यांना तीन दिवस पुरणार नाहीत, अशी टीकी सुळे यांनी केली.

Supriya Sule, Nirmala Sitharaman
'एकवेळ सुर्य पश्चिमेला उगवेल, पण बारामती पवारांचीच!'

दरम्यान त्यांनी यावेळी, 'रस्त्याबाबत नियमित चाचपणी सुरू आहे. हडपसर - सासवड रस्त्याबाबत काही अडचणी आहेत, त्या सोडवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. गडकरी यांनी खड्ड्याबाबत योजना चांगल्या हेतून राबवली आहे, त्याचे अधिकारी आहेत. अनेक रस्त्याची समस्या आहेत, सोडवल्या पाहिजेत. अनेक अपघात होत आहेत, असेही सुप्रिया सुळे म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com