By-Election : मतदारांना पैसे वाटताना भाजप कार्यकर्त्यांना पकडले; पावणेदोन लाखांची रोकड जप्त, गुन्हा दाखल

Pune News : चिंचवडला आणखी पावणेदोन लाखाची रोकड पकडली, गुन्हा नोंद, चिंचवडला आतापर्यंत ५९ लाख रुपये जप्त
By-Election
By-ElectionSarkarnama

पिंपरी : विधानसभा पोटनिवडणुकीत कसबापेठ, पुणे येथे भाजपने मतदारांना पैसे वाटल्याचा आरोप काल (दि.24 फेब्रुवारी) झाला. त्यानंतर काल रात्रीच चिंचवडमध्ये भाजपच्या तीन कार्यकर्त्यांना पैसे वाटतानाच पकडण्यात आले. त्यामुळे मोठी खळबळ उडाली असून याबाबत पोलिसांनी गुन्हा (एनसी) नोंदवला आहे.

या त्रिकूटाकडून एक लाख ७० हजार रुपयांची रोकड, भाजप उमेदवाराचे नाव व पक्षाचे चिन्ह कमळ चिन्हाच्या स्लिपा आणि मतदारांच्या नावाची यादी हस्तगत करण्यात आली आहे.

माधव मल्लिकार्जून मनोरे (वय ५,रा.रहाटणी), स्वप्नील सुरेश फुगे (वय ३५) आणि कृष्णा बालाजी माने (वय २४, दोघेही रा.फुगेवाडी) अशी आरोपींची नावे आहेत. मनोरे हा भाजपच्या प्रभाग ३३ चा अध्यक्ष असल्याचे सांगण्यात आले आहे.

By-Election
Nitin Gadkari : नितीन गडकरींच्या कार्यक्रमात गोंधळ; नेमकं काय घडलं?

याबाबतची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी रहाटणीतील तांबे शाळेजवळ रात्री 10 वाजता ही कारवाई केली. नंतर त्यांनी निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाला बोलावले. या पथकातील विकास त्रिभूवन यांच्या फिर्यादीवरून यांची फिर्याद घेऊन वाकड पोलिसांनी काळेवाडी चौकीत एनसी नोंदवली.

By-Election
Fadanvis : तुपकरांनी घेतली फडणवीसांची भेट, लाठीचार्जच्या चौकशीची केली मागणी !

एक लाख सत्तर हजारातील सर्व नोटा या दोन हजार रुपये मुल्याच्या आहेत. म्हणजे किमान एक मताला दोन हजार रुपये दिले जात असल्याचा अंदाज आहे. कालच सकाळी चिंचवडलाच दळवीनगर येथे एका मोटारीतून १४ लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली होती.

तर त्याअगोदर तेथूनच ४३ लाख रुपये दुसऱ्या एका मोटारीतून नेताना निवडणूक आयोगाच्या भरारी पथकानेच पकडले होते. त्यामुळे आतापर्यंत चिंचवडच्या पोटनिवडणुकीत ५९ लाख रुपये जप्त करण्यात आले आहेत.

By-Election
Sambhajinagar News : केंद्राने नामांतराचे टायमिंग साधले, तर प्रखर विरोधाचा एमआयएमला होणार फायदा..

या प्रकाराबाबत निवडणूक अधिकारी तर त्यात जप्त करण्यात आलेल्या पैशाबाबत प्राप्तीकर विभागाला कळविण्यात आले आहे. निवडणूक आयोगाच्या आदेशानंतर यासंदर्भात पुढील कारवाई केली जाईल, असे हा अदखलपात्र गुन्हा दाखल झालेल्या वाकड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सत्यवान माने यांनी `सरकारनामा`ला सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com