‘आमदार जगतापांच्या भावाच्या कार्यालयावर प्रसिद्धीसाठी हल्ला केला’
Laxman jagtap brother's office attackSarkarnama

‘आमदार जगतापांच्या भावाच्या कार्यालयावर प्रसिद्धीसाठी हल्ला केला’

आमदार लक्ष्मण जगताप यांच्या भावाच्या कार्यालयावरील हल्ल्याप्रकरणी तिघांना अटक

पिंपरी : भारतीय जनता पक्षाचे चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप (Laxman Jagtap) यांचे बंधू आणि उद्योजक शंकर जगताप यांच्या कार्यालयावर रॉकेल भरलेल्या बाटल्या टाकल्याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली. तर दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींना सहा दिवसांची कोठडी सुनावण्यात आली आहे. दहशत निर्माण करण्यासह प्रसिद्धीसाठी हा प्रकार केल्याचे आरोपी सांगत असले तरी पोलिसांकडून मूळ उद्देशापर्यंत पोचण्याचा प्रयत्न सुरू आहे. (Three arrested in attack on MLA Laxman Jagtap's brother's office)

Laxman jagtap brother's office attack
तटकरेंची मनधरणी आणि लाडांचे राजीनामानाट्य दोन दिवसांतच संपुष्टात!

प्रद्युम्न भोसले (वय २०), तन्मय मदने (वय १९), विक्रम जवळकर (वय २३, सर्व रा. सांगवी) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. दोन अल्पवयीन ताब्यात आहेत. या घटनेप्रकरणी राहुल राम साळुंके (रा. पिंपळे गुरव) यांनी पोलिसांत फिर्याद दिलेली आहे. शंकर जगताप यांच्या पिंपळे गुरव येथील चंद्ररंग डेव्हलपर्स अ‍ॅण्ड बिल्डर्स या कार्यालयाच्या दिशेने मंगळवारी (ता. २३) दुपारी पावणे तीनच्या सुमारास आरोपींनी रॉकेलच्या दोन पेटत्या बाटल्या फेकल्या होत्या. एक बाटली सीमाभिंतीवर पडून तिचा स्फोट झाला होता, तर दुसरी बाटली शेजारील एका शटरवर पडली होती. या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशियत आरोपींचा शोध सुरू केला होता.

Laxman jagtap brother's office attack
नाना पटोले बारामती मतदारसंघात आले आणि कोड्यात बोलून गेले!

दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणी तिघांना अटक केली असून, दोघांना ताब्यात घेतले आहे. या आरोपींकडे तपास केला असता त्यांनी दहशत निर्माण करण्यासह प्रसिद्धीसाठी हा प्रकार केल्याचे ते सांगत आहेत. मात्र, पोलिस उद्देशापर्यंत पोचण्याचा प्रयत्न करीत आहेत. अधिक तपास पोलिस करत आहेत.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in