शिक्षक होण्याची आस असलेल्या हजारो उमेदवारांना बसला एसटी संपाचा फटका
शिक्षक पात्रता परीक्षासरकारनामा

शिक्षक होण्याची आस असलेल्या हजारो उमेदवारांना बसला एसटी संपाचा फटका

परीक्षेसाठी चार लाख ६८ हजार ९४८ उमेदवारांनी अर्ज केले होते.

पुणे : राज्यातील लाखो उमेदवारांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे निर्माण झालेल्या प्रवासाच्या समस्येचा डोंगर पार करत शिक्षक होण्यासाठी अनिवार्य असणारी शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) रविवारी दिली. या संपामुळे हजारो उमेदवारांनी आदल्यादिवशीच परीक्षेच्या ठिकाणी मुक्काम ठोकला. या संपामुळे खिशाला बसलेली आर्थिक झळ सोसत अनेकांनी ही परीक्षा दिली.

 शिक्षक पात्रता परीक्षा
राज्य सरकारच्या जाचक अटींमुळे ३० लाख शेतकऱ्यांनी पीक विमा काढलाच नाही

राज्यातील एक हजार ४४३ केंद्रांवर रविवारी शिक्षक पात्रता परीक्षा झाली. या परीक्षेसाठी चार लाख ६८ हजार ९४८ उमेदवारांनी अर्ज केला होता. परंतु एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे काही उमेदवारांना घरापासून लांब असणाऱ्या परीक्षा केंद्रावर पोचण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागली. विविध कारणांमुळे टीईटी परीक्षा सातत्याने पुढे ढकलली जात होती. अखेर २१ नोव्हेंबर रोजी परीक्षा घेण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब झाला आणि रविवारी ही परीक्षा पार पडली.

 शिक्षक पात्रता परीक्षा
पुण्यात पालिका आधिकाऱ्यांचा अजब कारभार; पहिल्या बाजीरावांच्या नावाच्या पाटीला पैसे नाहीत म्हणे !

एका परीक्षा केंद्रात किमान १५० तर कमाल एक हजार २०० उमेदवारांच्या परीक्षेची व्यवस्था करण्यात आली होती. परीक्षा केंद्रावर अधिकाऱ्यांच्या विशेष पथकांनी हजेरी लावली.खासगी वाहनांना दुप्पट, तिप्पट प्रवास भाडे देऊन उमेदवारांनी परीक्षेचे ठिकाण गाठले आणि टीईटीची परीक्षा दिली. तर काही विद्यार्थ्यांना मात्र, एसटी संपामुळे गावाहून परीक्षा केंद्रावर पोचणे अशक्य झाले. परिणामी अनेकांना परीक्षा देता आली नाही.

Edited By : Umesh Ghongade

Related Stories

No stories found.