Thorat Vs Vikhe Patil : थोरातांनी नाशिकमधील महाआघाडीच्या उमेदवाराच्या विजयाची जबाबदारी घ्यायला हवी होती : विखे पाटलांनी वादात काडी टाकली

निवडणूक झाल्यानंतर अनेक मुद्दे उपस्थित करायचे. पक्षांतर्गत वाद चव्हाट्यावर आणायचा, हे योग्य नाही.
Radhakrishna Vikhe Patil-Balasaheb Thorat
Radhakrishna Vikhe Patil-Balasaheb ThoratSarkarnama

नारायणगाव (जि. पुणे) : काँग्रेसचे (Congress) ज्येष्ठ नेते, माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) हे विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते होते. काँग्रेस पक्ष हा महाविकास आघाडीचा (Mahavikas Aghadi) घटकपक्ष आहे. नाशिक (Nashik) मतदार संघातून महाविकास आघाडीचा उमेदवार विजयी करण्याची जबाबदारी त्यांनी स्वीकारली पाहिजे होती. मात्र, निवडणूक झाल्यानंतर अनेक मुद्दे उपस्थित करायचे. पक्षांतर्गत वाद चव्हाट्यावर आणायचा, हे योग्य नाही. ते व्यथित झालेत. अशी टीका महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी केली. (Thorat should have taken responsibility for victory of Maha Aghadi candidate in Nashik : Radhakrishna Vikhe Patil)

जुन्नर तालुक्यातील नारायणगाव येथील कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने आयोजित केलेल्या ग्लोबल कृषी जिल्हा महोत्सव २०२३ ,पीक प्रात्यक्षिके ,कृषी प्रदर्शन व पिक परिसंवादाचे उदघाटन, आज दुपारी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमानंतर पत्रकारांनी महसूल मंत्री विखे पाटील यांच्याशी संवाद साधला. नाशिक मतदारसंघातून अपक्ष उमेदवार सत्यजित पाटील विजयी झाले. त्यानंतर थोरात यांनी काँग्रेस विधिमंडळ सदस्य पदाचा दिलेला राजीनामा व काँग्रेस पक्षांतर्गत वादाविषयी त्यांनी भाष्य केले.

Radhakrishna Vikhe Patil-Balasaheb Thorat
Pradnya Satav Attack : पोरानं दारुच्या नशेत मोठी चूक केलीय; त्याच्या लेकरांकडं बघून एकवेळ माफ करा : आरोपीच्या आईची प्रज्ञा सातवांना विनंती

महसूल मंत्री विखे पाटील म्हणाले की, नाशिक मतदार संघातून सत्यजित पाटील विजयी झाले. महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पराभव झाला. त्यानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी राजीनामा दिला आहे. थोरात यांनी राजीनामा दिलाय, ते व्यथित झालेत, त्यांनी भावनिक आवाहन केले आहे. यापेक्षा महाविकास आघाडीचा उमेदवार नाशिक मतदारसंघातून पराभूत होतोय. काँग्रेस पक्ष हा महाविकास आघाडीचा घटकपक्ष आहे. थोरात हे विधिमंडळ काँग्रेसचे नेते होते. मतदार संघातून महाविकास आघाडीचा उमेदवार विजयी करण्याची जबाबदारी त्यांनी स्वीकारली पाहिजे होती. मात्र, निवडणूक झाल्यानंतर अनेक मुद्दे उपस्थित करायचे. पक्षांतर्गत वाद चव्हाट्यावर आणायचा हे योग्य नाही.

Radhakrishna Vikhe Patil-Balasaheb Thorat
Shahaji Bapu Patil Accident News : आमदार शहाजीबापू पाटील यांच्या ताफ्यातील गाडीला अपघात; एक ठार, एक चिंताजनक

पक्षांतर्गत वाद पक्ष नेतृत्व पाहिल. पक्षाच्या अंतर्गत वादाबद्दल ते जर निवडणूक काळात महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून आणण्यासाठी बोलले असते तर मला वाटते लोकांनी त्यांचे स्वागत केले असते. बाळासाहेब थोरात यांचे राजकीय भवितव्य काय, भाजपमध्ये आले तर त्यांचे स्वागत करणार का या बाबत पत्रकारांनी विचारले असता विखे पाटील म्हणाले भाजपमध्ये यायचे किंवा काय हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. त्यांच्या राजकीय भवितव्याबाबत त्यांनाच तुम्ही विचारावे, असे सांगून या प्रश्नाला त्यांनी बगल दिली.

Radhakrishna Vikhe Patil-Balasaheb Thorat
Pandharpur News : जयंत पाटलांच्या दौऱ्याआधीच पंढरपूर राष्ट्रवादीला मोठा धक्का : तालुकाध्यक्षांचा राजीनामा; भाजपच्या वाटेवर

वाळू लिलावाबाबत महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, यापुढे राज्यात कोणत्याही परिस्थितीमध्ये वाळूचे लिलाव होणार नाहीत. सामान्य माणसांचा विचार करून या बाबत नवीन धोरण आणले जाईल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com