काँग्रेसच्या कसब्यातील दोन्ही निवडणुकीतील विजयात थोपटेंचा आहे मोठा वाटा; तेव्हाही अनंतराव थोपटेंनी...

Ravindra Dhangekar News : कसबा पोटनिवडणुकीमध्ये काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी मोठा विजय मिळवला.
Ravindra Dhangekar, MLA Sangram Thope
Ravindra Dhangekar, MLA Sangram ThopeSarkarnama

Ravindra Dhangekar News : कसबा पोटनिवडणुकीमध्ये काँग्रेसचे (Congress) उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी मोठा विजय मिळवला. कसबा आणि चिंचवडच्या पोटनिवडणुकीकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले होते. कसब्यातील निवडणुकीत भाजप आणि महाविकास आघाडीमध्ये लढत झाली. त्यामध्ये भाजपला (BJP) मोठा धक्का बसला.

चिंचवडच्या निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादी आणि अपक्ष उमेदवार राहुल कलाटे अशी तिरंगी लढत झाली होती. कसब्यामध्ये काँग्रेसचे रवींद्र धंगेकर आणि भाजपचे हेमंत रासने यांच्यात सरळ लढत झाली होती. यामध्ये अनेक वर्षांचा भाजपचा बालेकिल्ला असलेल्या कसब्यात काँग्रेसने विजय मिळवला. तर चिंचवडची जागा वाचवण्यात भाजपला यश आले.

Ravindra Dhangekar, MLA Sangram Thope
Ajit Pawar News : अजित पवारांचं सूचक विधान; ''...तर शिंदेंसोबत गेलेल्यांना परत आणणार!''

धंगेकर यांनी रासने यांचा ११ हजार मतांनी पराभव केला. धंगेकरांच्या विजयाने तब्बल २८ वर्षानंतर भाजपचा बालेकिल्ला ढासळला. महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात धंगेकर यांच्या विजयाचा जल्लोष काँग्रेसकडून केला जात आहे. मात्र, एका मुलाखतीमध्ये भविष्यात काँग्रेसची साथ सोडणार का? यावर विचारले असता धंगेकर स्पष्टच बोलले.

या मुलाखतीत बोलताना धंगेकर म्हणाले, ''नाही, मी काँग्रेस सोडणार नाही. काँग्रेस हा सर्वसमावेशक विचारांचा पक्ष आहे. लहान वयात शिवसेनेत (Shiv Sena) गेलो होतो. शिवसेनेत व मनसेत असताना मानसन्मान मिळाला. काँग्रेसमध्येही मानसन्मान मिळाला. माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला काँग्रेसने कसब्यात उमेदवारी दिली. त्यामुळे काँग्रेसचे आभार मानले पाहिजे, असे धंगेकर यांनी स्पष्ट केले.

Ravindra Dhangekar, MLA Sangram Thope
Ravindra Dhangekar News : भविष्यात काँग्रेस सोडणार का? धंगेकरांनी स्पष्टच सांगितले

काँग्रेसचे आमदार संग्राम थोपटेंनी (MLA Sangram Thope) तर कसबा मतदारसंघ दत्तक म्हणून घेतला होता. त्यांचे वडील अनंतराव थोपटे यांनी पालकमंत्री असताना वसंततात्या थोरात यांना निवडून आणले होते. आज संग्राम थोपटेंनी ती कामगिरी केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळेंनी मार्गदर्शन केले. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही खूप मेहनत घेतली. कार्यकर्त्यांवर कसे प्रेम केले जाते, हे अजितदादांकडून शिकले पाहिजे, अशी भावना धंगेकर यांनी या मुलाखतीत व्यक्त केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com