यंदाचा नवरात्रोत्सव होणार आयुक्तांच्या आदेशानुसार..

धार्मिक स्थळे उघडणे आणि नवरात्र उत्सवाबाबत दोन आदेश महापालिका (PCMC) आयुक्त राजेश पाटील (Commissioner Rajesh Patil) यांनी काल (ता.५ ऑक्टोबर) काढले आहे.
यंदाचा नवरात्रोत्सव होणार आयुक्तांच्या आदेशानुसार..
PCMC Navratri UtsavSarkarnama

पिंपरी : पिंपरी-चिंचवडसह राज्यभरातील शाळा नुकत्याच (ता.४ ऑक्टोबर) सुरु झाल्या. त्यानंतर आता धार्मिक स्थळेही उद्यापासून (ता.७ ऑक्टोबर) उघडणार आहेत. दरम्यान, गणेशोत्सवाप्रमाणेच उद्यापासून सुरू होणारा नवरात्र उत्सव सुद्धा साधेपणानेच साजरा होणार आहे. त्यामुळे सगळ्यांचे आकर्षण व या उत्सवाचा केंद्रबिंदू असलेला गरबा, दांडिया होणार नाही. मुर्तीच्या उंचीवरील बंधने नवरात्र उत्सवावरही गणेशोत्सवासारखीच असणार आहे.

PCMC Navratri Utsav
पिंपरी-चिंचवडकरांना दिलासा, कोरोना रुग्णसंख्येत होतेय घट

कोरोनाचे नियम पाळूनच धार्मिक स्थळे उघडण्यास सांगण्यात आले आहे. मात्र, मूर्ती स्पर्श करता येणार नाही. तसेच, प्रसाद वाटपास बंदी असल्याने त्यापासूनही वंचित रहावे लागणार आहे. धार्मिक स्थळे उघडणे आणि नवरात्र उत्सवाबाबत दोन आदेश महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी काल (ता.५ ऑक्टोबर) काढले. कोरोनाची दुसरी लाट ओसरत चालली असली, तरी धोका कायम असल्याने या सणालाही गर्दी न करता तो साधेपणाने नियम पाळून साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. याबरोबर मिरवणुकीवर बंदी आहे. परवानगी घेऊन छोटा मंडप करून शक्यतो ऑनलाईन दर्शनव्यवस्था करण्यास नवरात्र मंडळांना सांगण्यात आले आहे. तसेच, घरगुती मुर्ती दोन, तर सार्वजनिक मुर्तीवर चार फूटाचे बंधन घालण्यात आले आहे. तसेच, ती शक्यतो घरातील वा शाडूच्या मातीची असावी. विसर्जन घरातच वा कृत्रिम तलावात करावे,अशी सूचना करण्यात आली आहे.

PCMC Navratri Utsav
तीन सदस्यीय प्रभाग : पिंपरी-चिंचवडमध्ये राजकीय समीकरण बदलली..

६५ वर्षे वयावरील नागरिक, को-मॉर्बिड लक्षणे असलेले व्यक्ती, गर्भवती महिला व १० वर्ष वयोगटाखालील मुलांनी धार्मिक स्थळी न जाता घरीच थांबावे,असे आवाहन पुणे जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी केले आहे. धार्मिकस्थळे किंवा प्रार्थनास्थळांच्या परिसरात थुंकण्यास बंदी घातली आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. प्रवेशद्वारावर हात धुण्याची व्यवस्था करण्यास सांगण्यात आले असून टप्पाटप्याने प्रवेश देण्यास सांगण्यात आले आहे. दर्शन घेण्याकरीता सोशल डिस्टन्सींगचे पालन करुन रांगेत उभे राहण्यासाठी खुणा करुन सहा फुट अंतर ठेवण्यात सांगितले तर, रांगेमध्ये उभे राहतांना दोन भाविकांमध्ये सहा फुट अंतर ठेवण्याची जबाबदारी व्यवस्थापनाची राहणार आहे.

याबरोबरच मुर्ती, पुतळा, पवित्र पुस्तके यांना स्पर्श करण्यास प्रतिबंध आहे. धार्मिक स्थळांच्या ठिकाणी जागा, अंतर व संख्या याबाबत नियमांच्या पालनाचे हमीपत्र पोलीस विभाग व स्थानिक स्वराज्य संस्था यांना द्यावे लागणार आहे. त्याचे उल्लंघन झाल्यास फौजदारी कारवाई केली जाणार आहे.

Related Stories

No stories found.