सत्ता आल्याने आमदार लांडगे यांचा `आखाड` जोरात... त्यांचा आकडा ऐकून धक्काच बसेल!

BJP|PCMC|Mahesh Landge : सत्तर हजार जणांच्या जेवणाची व्यवस्था करण्यात येणार आहे.
BJP MLA Mahesh Landge Latest News
BJP MLA Mahesh Landge Latest News Sarkarnama

पिंपरी : श्रावण सुरु होण्यास अवघे तीन दिवस राहिल्याने आखाड पार्ट्या सध्या रंगात आल्या आहेत. पिंपरी-चिंचवडमध्ये, (Pimpri-Chinchwad) तर उद्या शहरातीलच नव्हे, तर राज्यातीलही सर्वात मोठी अशी आखाड पार्टी होणार आहे. राज्यातील लोकप्रतिनिधीने एका दिवशी एका वेळी दहा ठिकाणी दिलेली ही पहिली मेगा आषाढ मेजवानी असणार आहे. तीत सुमारे ७० हजार जणांच्या सामिष जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. (BJP MLA Mahesh Landge Latest News)

BJP MLA Mahesh Landge Latest News
सोशल मिडियावरील ते रिक्षाचालक मुख्यमंत्री ठाण्याचे नाही, तर पिंपरीचे

भोसरीचे भाजप (BJP) आमदार आणि पक्षाचे पिंपरी-चिंचवड अध्यक्ष महेश लांडगे (Mahesh Landge) यांनी ही जंबो आखाड पार्टी मतदारसंघात दहा ठिकाणी उद्या रात्री आयोजित केली आहे. मेगा इव्हेंट कार्यक्रम करण्यात त्यांची टीम तज्ज्ञ आहे. मग, त्यांनी यावर्षी २८ ते ३१ मे दरम्यान भरवलेली दीड कोटी रुपये बक्षिसांची देशातील सर्वात मोठी अशी हजारोंनी उपस्थिती लावलेली बैलगाडा शर्यत असो, की दरवर्षी आय़ोजित करण्यात येणारी आणि कोट्यवधी रुपयांची उलाढाल होणारी इंद्रायणी थडी जत्रा असो वा भरवलेली महाराष्ट्र केसरी स्पर्धा. त्यांचा प्रत्येक कार्यक्रम हा ग्रॅन्ड इव्हेंट असतो व ठरतो.

BJP MLA Mahesh Landge Latest News
आढळराव पाटील कोठूनही निवडणूक लढवा निष्ठावंत शिवसैनिक तुमचा पराभवच करेल...

दरवर्षी आखाडही ते असाच साजरा करतात. हे त्याचे सातवे वर्ष आहे. गेल्यावर्षी तो एकाच वेळी सहा ठिकाणी केला गेला. त्याचा ४३ हजार जणांनी लाभ घेतला. तर, यावेळी तो दहा ठिकाणी होणार आहे. त्याचे नियोजन त्या त्या भागातील माजी नगरसेवक व पदाधिकाऱ्याकडे देण्यात आले आहे. याव्दारे सत्तर हजार जणांच्या जेवणाची व्यवस्था करण्यात येणार आहे. चुलीवरचे मटण आणि भाकरी तसेच सुगंधी इंद्रायणी भात व नंतर जिलेबी आणि गुलाबजामून असा फक्कड बेत आहे. २१०० किलो मटन, तेवढेच चिकण, बाराशे ३० किलोचे मासे, १३ हजार अंड्यांची व्यवस्था या पार्टीसाठी करण्यात आली आहे. काही मंगल कार्यालयेच त्यासाठी बुक करण्यात आली आहेत. या मेजवान्यांची निमंत्रणे देण्यास धडाक्यात सुरवातही झाली आहे. तीस लाख रुपये खर्च यावर होईल, असा अंदाज आहे.

BJP MLA Mahesh Landge Latest News
बारणे ज्या पक्षात जातात तो पक्ष संपतो, आता शिंदे गटही संपवून टाकतील

दरम्यान, शहरातील भाजप नगरसेविका कमल घोलप यांच्या विवाहित कन्येचे आकस्मिक निधन झाल्याने त्यांच्या भागात ही पार्टी न ठेवण्याची खबरदारी घेण्यात आली आहे. तसेच भाजप पुन्हा सत्तेत आल्याने यावेळचा आखाड आणखी जोरात होत आहे. त्यामुळेच त्याच्या पार्ट्याच्या ठिकाणांची संख्या वाढवून ती सहावरून दहावर नेण्यात आली आहे. गेल्यावर्षाच्या ४३ हजार या आकड्यात मोठी वाढ करून यावेळी ७० हजार `भोसरी`करांना आखाड पार्टी देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. गत टर्मला पिंपरी-चिंचवड महापालिकेत भाजपच सत्तेत होता. ती २०१७ ला आणण्यात आमदार लांडगेंचा मोठा वाटा आहे. त्यामुळे ती टिकवून २०२२ ला पुन्हा सत्तेत येण्याचे गणितही या जंबो आखाडामागे असल्याची चर्चा ऐकायला मिळते आहे. सध्या प्रशासक असलेल्या पिंपरी पालिकेची निवडणूक पावसाळा संपताच होणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in