Sangram Thopte News : थोपटे आणि फडणवीसांच्या भेटीचे ‘हे’ आहे खरे कारण!

Sangram Thopte News : बारामती कॉंग्रेसच्यावतीने (Congress) आज बारामतीत कार्यकर्ता मेळावा घेण्यात आला.
Sangram Thopte, Devendra Fadnavis
Sangram Thopte, Devendra FadnavisSarkarnama

Sangram Thopte News : बारामती कॉंग्रेसच्यावतीने (Congress) आज बारामतीत कार्यकर्ता मेळावा घेण्यात आला. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी मेळाव्याला मार्गदर्शन केले. मात्र, या मेळाव्याला जिल्ह्यातील भोरचे आमदार संग्राम थोपटे यांची उनुपस्थिती व त्याचवेळी पुण्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीशी झालेल्या आमदार थोपटे यांच्या भेटीने जिल्ह्याच्या राजकाणात एकच खळबळ उडाली आहे.

आमदार थोपटे उपमुख्यमंत्री फडणवीस यांना का भेटले हाच एक चर्चेचा विषय होता. मात्र, यावर आमदार थोपटे यांनी ‘सरकारनामा’शी बोलताना स्पष्टीकरण दिले आहे. आमदार थोपटे म्हणाले, ‘‘फडणवीस यांच्याशी झालेली भेट राजकीय नव्हती. मतदारसंघातील कामाच्या पाठपुराव्यासाठी त्यांची भेट घेतली. बारामतीत प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा कार्यक्रम होता. मात्र, मी पुण्याबाहेर होतो. फडणवीस यांची भेट घेऊन मतदारसंघातील काम मार्गी लावणे आवश्‍यक होते. त्यामुळे पुण्यात पोहचून फडणवीस यांची भेट घेतली. त्यानंतर बारामतीमधील मेळाव्याला पोचणे शक्य नव्हते.’’

Sangram Thopte, Devendra Fadnavis
Amit Shah News : अमित शाह यांनी ते पोस्टर पाहिले अन् राज्यातील सत्तांतराची वात पेटली?

या विषयाची चर्चा इतकी झाली की आमदार थोपटे यांच्या फडणवीस भेटीचा खुलासा नाना पटोले यांना करावा लागला. साखर कारखानदारीच्या प्रश्नाबाबत दिल्लीला गेले होते, तेथून ते परत आल्यानंतर त्यांनी राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. मात्र, यातून राजकीय अर्थ काढण्याची गरज नाही, थोपटे परिवार कायमच कॉंग्रेस सोबत होता आणि तो कायमच असेल, असे पटोले यांनी सांगितले.

Sangram Thopte, Devendra Fadnavis
Nana Patole News : नाना पटोले बारामतीत अन् जिल्ह्यातील काँग्रेसच्या मोठ्या नेत्याने घेतली फडणवीसांची भेट

जिल्ह्यात कॉंग्रेसचे दोन आमदार आहेत. पुरंदरमधून संजय जगताप व भोरमधून संग्राम थोपटे आमदार आहेत. जिल्ह्यात राष्ट्रवादीचा वरचश्‍मा असताना या दोन तालुक्यातून कॉंग्रेसने आपला झेंडा कायम राखला आहे. त्यातच राज्यातील काही आमदार भाजपाच्यासंपर्कात असल्याची चर्चा अधून-मधून होत असते. त्यामुळे आमदार थोपटे यांच्या भेटीचे वेगळे अर्थ काढण्यात येऊ लागल्याने आमदार थोपटे यांच्यासह प्रदेशाध्यक्ष पटोले यांनाही या भेटीचा खुलासा करावा लागला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com