Maval News : मावळातील गोपाळे,आवारेंच्या निर्घृण खुनांमागं 'हे' एकच आहे कारण; पोलिसांची मोठी माहिती

Kishor Aware Murder case : या प्रत्येक खूनानंतर संपूर्ण मावळ तालुका हादरून गेला.
Kishor Aware, Praveen Gopale Murder case
Kishor Aware, Praveen Gopale Murder case sarkarnama

उत्तम कुटे

Maval News : मावळ तालुक्यात गेल्या दीड महिन्यात दोन जणांचा निर्घूण खून करण्यात आला. प्रति शिर्डी शिरगावचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सरपंच प्रवीण गोपाळे यांच्या खुनाची घटना ताजी असतानाच तळेगाव दाभाडे नगर परिषदेतील माजी सत्ताधारी जनसेवा विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे यांचा शुक्रवारी (दि.१२) भरदिवसा तळेगावात निर्घूण खून झाला. या खुनाच्या घटनांनी मावळ तालुका हादरला आहे. पण या दोन्ही खुनांमध्ये एक महत्वाचं साम्य समोर आलं आहे.

किशोर आवारे(Kishor Aware) यांचा भरदिवसा तळेगावात निर्घूणपणे खून करण्यात आला होता. यामुळे मावळ तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे.आवारेंच्या हत्येत आरोप,प्रत्यारोपही झाले.तसेच या खूनाच्या गुन्ह्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे स्थानिक आमदार सुनील शेळके यांना आरोपी करण्यात आल्यानं हे प्रकरण चांगलंच तापलं. पण आता मावळ तालुक्यातील खुनाच्या घटना निव्वळ अपमान झाल्याचा बदला म्हणून झाल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आलं आहे.

Kishor Aware, Praveen Gopale Murder case
Kishor Aware Murder case Update: किशोर आवारेंच्या हत्येचा मुख्य सुत्रधार सापडला; आरोपींनी पोलिसांना दिली धक्कादायक माहिती

दोन्ही खूनांत कोयत्याचा वापर...

गोपाळे आणि आवारेंचे खून हे अपमानातून झाल्याची माहिती देणारे पोलीस अधिकारी हे एकच म्हणजे एसीपी पद्माकर घनवट आहेत हा पहिला योगायोग आहे. तर, हे दोन्ही खून जमीन खरेदी विक्रीच्या व्यवहारातून झाल्याचा संशय प्रथम व्यक्त करण्यात आला होता. तो नंतर तपासात खोटा ठरला, हा दुसरा योगायोग ठरला. दोन्ही खून मारेकऱ्यांनी पाळत ठेवून केले. त्यासाठी त्यांनी रेकीही केली होती. दोन्ही खूनांत कोयत्याचा वापर झालेला आहे.

...म्हणून गोपाळेंना ठार मारण्याचा प्लॅन ठरला!

या प्रत्येक खूनानंतर संपूर्ण मावळ(Maval) तालुका हादरून गेला.गोपाळेंच्या खूनातील मुख्य आरोपी हा त्यांच्याविरुद्ध डिसेंबर २०२२ च्या ग्रामपंचायत निवडणुकीतील प्रतिस्पर्धी पॅनेलचा प्रमुख आहे.ऐनवेळी त्याच्या पॅनेलने माघार घेतल्याने ही निवडणूक बिनविरोध झाली. गोपाळे सरपंच झाले.त्यामुळे माघार घेतल्याने या आरोपीला त्याचे मित्र दुषणे देऊ लागले. टोमणे मारू लागले. चिडवू लागले.हा अपमान सहन न झाल्याने त्याने गावातीलच तरुणांना हाताशी धरीत नवनिर्वाचित सरपंच गोपाळेंना ठार मारण्याचा प्लॅन करून तो अंमलात आणला होता.

Kishor Aware, Praveen Gopale Murder case
Pune News : राष्ट्रवादीला मोठं खिंडार : 'मिशन बारामती' मध्ये बडा नेता भाजपमध्ये..; उद्या कमळ हाती घेणार

तसेच आवारे यांच्या खूनातही घडले.त्यांनी त्यांच्या खूनातील मुख्य आरोपी गौरव खळदे याच्या वडिलांच्या मुस्काटीत ती ही तळेगाव नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांच्या दालनाबाहेर आवारेंनी डिसेंबरमध्ये चारचौघांसमोर लगावली होती. वडिलांचा झालेला हा अपमान सहन न झाल्याने चिडलेल्या गौरवने या अपमानाचा बदला म्हणून आवारेंचा सुपारी देऊन खून केल्याचे पोलिसां(Police)च्या तपासात निष्पन्न झाले आहे.

Kishor Aware, Praveen Gopale Murder case
Bharat Gogawale News: शिंदे गटाच्या गोगावलेंचं मंत्रिपदाबाबत मोठं विधान,म्हणाले, ''पक्षप्रतोद पद गेलं,आता...''

मुंबई व पुण्याच्या लोणावळा-खंडाळा या थंड हवेच्या ठिकाणाजवळ असल्याने मावळातील जमिनींना सोन्याचे नाही,तर प्लॅटिनमचा भाव आलेला आहे.त्या विकून वा त्या एमआयडीसीने घेतल्याने स्थानिकांच्या हातात बक्कळ पैसा आला आहे.त्यातून मावळचा मुळशी पॅटर्न झाला आहे.वरील दोन खून त्याला दुजोरा देत आहेत.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in