Shivsena| Raghunath Kuchik
Shivsena| Raghunath Kuchik

शिवसेनेला संपवण्यासाठी 'हे' भाजपचे षडयंत्र; रघुनाथ कुचिकांचा गौप्यस्फोट

Pune Politics| Shivsena| आताच जर शिवसेनेला थोपवलं तर पुढचे पंचवीस वर्ष शिवसेना आजूबाजूलाही दिसणार नाही

पुणे : ''भाजपने मला बदनाम करण्याचा प्रयत्न केला. भाजपने (BJP) अप्रत्यक्षरित्या किती लोकांना त्रास दिला. ईडी, सीबीआय पासून कुठलाही नेता सुटला नाही. एवढेच काय तर वैयक्तिक चारित्र्य हननापासून देखील सुटला नाही. त्याचा बळी मी आहे. मी हे सगळं भोगलंय. तुमच्याकडे इनकम नसेल तर तुमचं चारित्र्य पाहिलं जातं,'' असे घणाघाती आरोप पुण्याचे शिवसेना (Shivsena) नेते रघुनाथ कुचिक यांनी केला आहे.

शिवसेनेतील डॅमेज कंट्रोलसाठी राज्यभरात मेळावे, बैठकांचे सत्र सुरु आहे. अशात पुण्यात झालेल्या बंडाळीच्या पार्श्वभूमीवर शनिवारी पुणे जिल्ह्याचे संपर्कप्रमुख सचिन अहिर यांच्या नेतृत्वात शिवसेनेचा एक मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यात लैंगिक छळाचा आरोप असणारे रघुनाथ कुचिकही मंचावर उपस्थित होते. त्यामुळे ते नेमकं काय बोलणार, याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलं होतं.

Shivsena| Raghunath Kuchik
Eknath Shinde : मर्जीतील अधिकाऱ्यांना झुकते माप ; 'मातोश्री' जवळचे 'वेटिंग' वर

यावेळी बोलताना रघुनाथ कुचिक म्हणाले,''कोरोना काळात देशातल्या दुसऱ्या कोणत्याही मुख्यमंत्र्याने असं काम केलं नसेल, असं काम तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं. त्याचीच सल केंद्रांतील मंत्र्याना होता. म्हणून त्यांच्याविरोधात ही कारस्थाने केली गेली. आतापर्यंत अनेकदा बंडखोरी झाल्या. पण ही बंडखोरी टिकणार नाही. त्यामुळे आता सच्चा शिवसैनिकाने तितक्याचे त्वेषाने कामाला लागलं पाहिजे. शिवसैनिकाने थोडे कष्ट घेतल्यास आपण महापालिका काय विधानसभा निवडणूकांही जिंकू,'' असा विश्वास कुचिक यांनी व्यक्त केला.

''मी आताही सांगतो, भाजपचे हे दलालीचे षडयंत्र आहे, उद्धव ठाकरे यांच्यावरील केंद्रांचा रोष आणि येणाऱ्या महापालिका निवडणूका केंद्रस्थानी ठेवून हे शिवसेना संपवण्याचा घाट घालण्यात आला आहे. आताच जर शिवसेनेला थोपवलं तर पुढचे पंचवीस वर्ष शिवसेना आजूबाजूलाही दिसणार नाही, हा भाजपचा डाव आहे. मुंबई हा शिवसेना प्राण आहे, महाराष्ट्राचा प्राण आहे, त्यामुळे मुंबई सांभाळायची जबाबदारी तुमची आणि माझी आहे. त्यामुळे शिवसैनिकाच्या खांद्याला खांदा लावून चार पावलं चाला, आपला विजय नक्की आहे,'' असही कुचिक यांनी म्हटलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com