राज्याबाहेर उद्योग जाताहेत या टीकेला अर्थ नाही..अनेक उद्योग वेटिंगवर आहेत...

Narayan Rane : उगीच टीका करायची म्हणून करु नये.
Union Minister Narayan Rane Latest Marathi News
Union Minister Narayan Rane Latest Marathi NewsSarkarnama

बाबा तारे

पुणे : "राज्यात उद्योग वाढावेत तसेच नवनवीन तंत्रज्ञान विकसित व्हावे यासाठी आमचे सरकार प्रयत्न करत आहे. मात्र काही उद्योग बाहेर गेले असले तरी देखील अनेक उद्योग महाराष्ट्रात येण्यासाठी वेटिंगवर आहेत. त्यामुळे राज्याबाहेर उद्योग जात असल्याच्या विरोधकांच्या टिकेला काही अर्थ नसल्याची प्रतिक्रिया भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री राणे यांनी दिली आहे.

त्यांनी आज (ता.८ नोव्हेंबर) पुण्यातील बावधन येथे महिला उद्योजकांनी बनवलेल्या वस्तूंच्या प्रदर्शनाला भेट दिली. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. (Union Minister Narayan Rane Latest Marathi News)

राणे म्हणाले, कालपर्यंत सत्तेत असलेल्यांना उद्योग आणता आले नाही आणि आता उद्योग गेले म्हणून टिका करत आहेत. आमची सत्ता येऊन तीन महिने झालेत पुढे बघा आमचे सरकार उद्योगांसाठी पोषक वातावरण तयार करेल आणि नवीन रोजगारही निर्माण होईल, असा विश्वास राणेंनी यावेळी व्यक्त केला.

Union Minister Narayan Rane Latest Marathi News
चंद्रकांतदादांचा 'हा' सल्ला नेते ऐकणार का?

राज्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाईसाठी पॅकेज जाहीर केले नसले‌ तरी आम्ही शेतकऱ्यांना मदत करत आहोत. ओला दुष्काळ जाहीर करुन नुकसान भरपाईचे पॅकेज देताना केंद्र व राज्य सरकारचे काही नियम असतात त्याची पुर्तता करुन केंद्र सरकार मदत देईल. उध्दव ठाकरे यांनी मुख्यमंत्री असताना शेतकऱ्यांना कुठलीही मदत केली नाही. निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपयांची मदत करण्याचे त्यांनी आश्वासन दिले होते. मात्र सत्ता आल्यानंतर काहीच मदत केली नाही.

Union Minister Narayan Rane Latest Marathi News
बारामतीची लढत भाजपने मनावर घेतली; सीतारामन यांचा अवघ्या दोन महिन्यांत दुसरा दौरा

दरम्यान, मंत्री अब्दुल सत्तार यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्याबाबत केलेल्या विधानावर राणेंनी बोलणं टाळलं. तसेच, 'राज्यातील सुक्ष्म,लघू व मध्यम उद्योग राज्याबाहेर जात आहेत हे जयंत पाटील चुकीचे बोलत असून त्यांचा याबाबतीत अभ्यास कमी असून त्यांनी याविषयी अभ्यास करुन बोलावे, असा पाटलांना टोला लगावत त्यांनी उगीच टीका करायची म्हणून करु नये. राष्ट्रवादी पक्षच 'फेक' आहे, अशा शब्दात राणेंनी राष्ट्रवादीवर निशाणा साधला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com