पुण्यात तुर्तास लॉकडाऊन नाही : पण निर्बंध आणखी कडक ; होळी-रंगपंचमीस मनाई

शहरात सध्यातरी लॉकडाऊन न करण्याचा निर्णय पालकमंत्री अजित पवार यांनी आज जाहीर केला.
sar32.jpg
sar32.jpg

पुणे : पुणे व पिंपरी चिंचवड शहर आणि जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत असला तरी शहरात सध्यातरी लॉकडाऊन न करण्याचा निर्णय पालकमंत्री अजित पवार यांनी आज जाहीर केला.

या निर्णयाने पुणेकरांची तात्पुरती का होईना लॉकडाऊनमधून सुटका झाली आहेम मात्र, परिस्थितीत सुधारणा न झाल्यास पुढच्या आठवड्यात लॉकडाऊनचा निर्णय घ्यावा लागेल, असा सूचक इशारा पालमंत्री पवार यांनी दिला आहे. तूर्ताक कोरोनाचा प्रसार रोखण्यास निर्बंध अधिक कडक करण्यात आले आहेत. शहरातील शाळा. महाविद्यालये येत्या ३० एप्रिलपर्यंत बंद राहणार आहेत. परंतु याला दहावी, बारावीच्या वर्गांचा अपवाद करण्यात आला आहे. अत्यावश्‍यक सेवांना निर्बंधातून वगळण्यात आले आहे.

पुणे शहर व जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या मागील तीन आठवड्यांपासून वेगाने वाढू लागली आहे. संसर्गाचा दरही वाढला आहे. यामुळे शहरात पुन्हा
लॉकडाऊनची अंमलबजावणी केली जाते की काय, अशी भीती नागरिकांमध्ये निर्माण झाली होती. त्यामुळे पुणेकरांचे पालकमंत्र्यांच्या आजच्या बैठकीकडे लक्ष
लागले होते. आजच्या या निर्णयाने लॉकडाऊनची भीती दूर झाली आहे. दरम्यान, शहरातील शाळा महाविद्यालये येत्या ३० एप्रिलपर्यंत बंदच राहणार
असले तरी सध्या सुरू असलेले ऑनलाइन शिक्षण सुरूच राहणार आहे.

कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या प्रतिबंधासाठी कोरोना लसीकरण वाढविणे, सरसकट लसीकरणासाठी केंद्र व राज्य सरकारकडे पाठपुरावा करणे, कोरोनाचा
संसर्ग वाढत असलेल्या भागात कॉन्टॅक्ट ट्रेसिंग वाढविणे, कोरोनाचे वेळेत निदान करण्यासाठी प्रयोगशाळांमधील चाचण्यांची क्षमता वाढविणे आदी बाबींवर
विशेष भर देण्याचा आदेश पालकमंत्री पवार यांनी दिला आहे.


होळी-रंगपंचमीस मनाई
सार्वजनिक ठिकाणी होळी, धूलिवंदन आणि रंगपंचमी उत्सव साजरे करण्यास पुण्यात मनाई करण्यात आली आहे.

पुणे शहर व पिंपरी व जिल्ह्यात कोरोनाचा प्रभाव वाढत आहे. रुग्णांची संख्या रोज झपाट्याने वाढत आहे. ही संख्या वेळीच कमी करण्यासाठी काही कठोर उपाययोजना आमलात आणल्या जाण्याची शक्यता आहे. त्याचच भाग म्हणून आज ही घोषणा करण्यात आली. या आदेशानुसार होळी व रंगपंचमी मोकळ्या जागेत, मैदानावर, सोसाटट्यांच्या आवारात तसेच हॉटेल व रिसॉर्टमध्ये करता येणार नाही.

येत्या २८ मार्च रोजी होळी असून, २९ मार्च रोजी धूलिवंदन आणि २ एप्रिलला रंगपंचमी आहे. खबरदारीच्या उपाययोजना म्हणून गर्दी टाळण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी हे उत्सव साजरे करण्यास मनाई करण्यात येत आहे. या आदेशाचे पालन करुन नागरिकांनी जिल्हा प्रशासनास सहकार्य करावे. तसेच, आदेशामधील कोणत्याही तरतुदीचा भंग केल्यास संबंधितांविरुध्द आपत्ती व्यवस्थापन कायदा-२००५ आणि कायद्यातील इतर तरतुदींनुसार कारवाई येईल, 


काय बंद राहणार
- शाळा, महाविद्यालये (दहावी, बारावीचा अपवाद वगळता).
- शहरातील सार्वजनिक उद्याने (गार्डन्स). (फक्त रोज सायंकाळी)
- गृहनिर्माण सोसायट्यांमधील क्लब हाऊसेस. (पुढील आदेशापर्यंत)
- रात्री १० वाजण्याच्या पुढे दुकाने, हॉटेल, रेस्टॉरंट.
- मोठे लग्न समारंभ, सभा, सार्वजनिक कार्यक्रम.
- रात्री १० वाजण्याच्या पुढे मॉल्स, चित्रपटगृहे.
- रात्री १० वाजण्याच्या पुढे रस्त्याच्या कडेवरील स्टॉल्स.

काय चालू राहणार
- दुकाने, हॉटेल, रेस्टॉरंट (रात्री दहा वाजेपर्यंत).
- हॉटेलमधून जेवणाचे पार्सल नेणे (फक्त रात्री १० ते ११ या वेळेत)
- सार्वजनिक उद्याने सकाळी ६ ते १० या वेळेत चालू राहणार.
- लग्न, अंत्यविधी व अन्य समारंभ (लग्नासाठी कमाल फक्त ५० व अंत्यविधीसाठी २० व्यक्तींची उपस्थिती अनिवार्य).
- अभ्यासिका निम्म्या क्षमतेने.
- आंतरजिल्हा प्रवास करण्यास मुभा.
- रस्त्याच्या कडेवरील स्टॉल्स (रात्री १० वाजेपर्यंत).
- सार्वजनिक वाहतूक (निम्म्या क्षमतेने).
Edited By : Umesh ghongade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com