Devendra Fadnavis, Ajit Pawar, Ashok Pawar
Devendra Fadnavis, Ajit Pawar, Ashok PawarSarkarnama

अजितदादांच्या तालमीत तयार झालेला नेता फडणवीस उतरवणार अशोक पवारांच्या विरोधात?

Shirur News : पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसला (NCP) घेरण्यासाठी भाजपने (BJP) मोर्चे बांधणी सुरु केली आहे.

Shirur News : पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसला (NCP) घेरण्यासाठी भाजपने (BJP) मोर्चे बांधणी सुरु केली आहे. जिल्ह्यातील शिरूर, बारामती, मावळ, जुन्नर, आंबेगाव, इंदापूर यासारख्या मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादीचे आमदार आहे. यातील अनेक मतदारसंघांमध्ये भाजपकडून राष्ट्रवादीला आव्हान दिले जात आहे.

अशातच शिरूरची जागाही राष्ट्रवादीकडून हिसकावण्यासाठी भाजपने आतापासूनच मोर्चेबांधणी सुरू केली आहे. कारण भाजपचे दिवंगत माजी आमदार बाबुराव पाचर्णे यांच्या निधनानंतर राष्ट्रवादीचे आमदार अशोक पवार (Ashok Pawar) यांना तुल्यबळ असा विरोधक राहिला नाही, अशा चर्चा मतदार संघात सुरु आहे. त्यातच आता भाजप नवीन खेळी करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या जवळचे म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एका नेत्याच्या नावाची चर्चा आहे.

Devendra Fadnavis, Ajit Pawar, Ashok Pawar
शाहंसोबतच्या बैठकीनंतरही मंत्रिपदाचे इच्छुक गॅसवर; आमदारांच्या असंतोषाची भीती?

भाजप आता डाव टाकण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे. राष्ट्रवादीमध्ये असताना जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहिलेले प्रदीप कंद यांचे नाव भाजपकडून घेतले विधानसभेसाठी घेतले जात आहे. कंद हे पेरणे-वाडे बोल्हाई जिल्हा परिषद गटाचे नेतृत्व करतात. त्यांच्या बालेकिल्ल्यात ते मताधिक्याने निवडून येतात. भाजपने कंद यांना जर उमेदवारी दिली तर त्यांच्याकडून शिरूरसाठी पूर्ण ताकत लावण्याची शक्यता आहे.

कारण पाचर्णे यांच्यानंतर मंगलदास बांदल हे देखील ताकदीचे नेते शिरूर तालुक्यात होते. मात्र, एका जमीन गैरव्यवहार प्रकरणात ते अडकले. त्यामुळे भाजपसमोर प्रदीप कंद नावाचा चांगला पर्याय आहे. कंद यांनी नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत लोणीकंद ग्रामपंचायत निवडणुकीत सर्व जागा निवडून आणत आपली चुणूक दाखवून दिली आहे. त्यामुळे भाजपकडून सध्या तरी त्यांच्या नावाचाच विचार सुरू असल्याची माहिती आहे.

कंद हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुशीत तयार झालेले आणि विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जायचे. पवारांमुळे त्यांना पुणे जिल्हा परिषदेत २०१४ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी सुरूवातीला उपाध्यक्ष आणि त्यानंतर अध्यक्षपदाची संधी मिळाली. जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्षपदाचा कार्यकाल संपल्यानंतर कंद यांना २०१४ मध्ये विधानसभेच्या उमेदवारीची अपेक्षा होती. मात्र, अशोक पवार यांच्यासाठी त्यांना थांबावे लागले.

२०१९ मध्ये त्यांना शिरूर लोकसभेची ऑफर होती, असेही सांगितले जाते. मात्र, त्यासाठी कंद यांनी नकार दिला. २०१९ च्या विधानसभेलाही अशोक पवार यांना पुन्हा संधी दिल्याने कंद नाराज झाले होते. त्यांनी निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला. मात्र, भाजपकडून पाचर्णे यांना उमेदवारी देण्याचे ठरवले होते. त्यामुळे कंद यांना उमेदवारी मिळाली नाही.

Devendra Fadnavis, Ajit Pawar, Ashok Pawar
Bacchu Kadu News : बच्चू कडूंच्या भावाला पाडण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी अन् भाजपची हातमिळवणी

दरन्यान, जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या उमेदवाराला धक्का देत कंद यांनी निवडणूक जिंकली होती. त्यामुळे राष्ट्रवादीची अडचण झाली. कंद हे सध्या जिल्हा बँकेच्या संचालक पदावर कार्यरत आहेत. असे असले तरी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी शिरूरमधून भाजपकडून कंद यांना उतरवण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. दरम्यान, राष्ट्रवादीचे आमदार अशोक पवार यांच्यासारख्या तालुक्यातील दिग्गज राजकीय नेत्यासमोर कंद कितपत यशस्वी ठरतात, हे बघणे महत्वाचे ठरणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com