Pune MNS : वसंत मोरेंना पुन्हा डावलल्याची चर्चा; नेमके काय घडले?

Vasant More News : वसंत मोरे यांनी ठाकरेंचं भाषण पाठिमागं उभं राहून ऐकलं.
Vasant More
Vasant More Sarkarnama

Vasant More News : ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त तीन दिवसीय 'अशोक पर्व' या कार्यक्रमाचे पुण्यातील कोथरूडमध्ये आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमादरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते अशोक सराफ यांचा सन्मान करण्यात आला. त्यानंतर या कार्यक्रमात राज ठाकरे यांनी जोरदार भाषण केलं. मात्र याचवेळी चर्चा झाली ती वसंत मोरे यांच्या एका फोटोची.

राज ठाकरे (Raj Thackeray) यांचं भाषण ऐकण्यासाठी पुण्यातील नागरिकांसह मनसेचे अनेक नेते उपस्थित होते. याचवेळी वसंत मोरे यांनी ठाकरेंचं भाषण पाठिमागं उभं राहून ऐकलं. पण याचवेळी मनसेचे इतर नेते समोर बसून भाषण ऐकत होते. तर वसंत मोरे पाठिमागं उभा राहून भाषण ऐकत असतानाचे फोटो व्हायरल झाले.

Vasant More
Aurangabad : नामांतराच्या मुद्यावरून कोंडी, हर्षवर्धन जाधव आता कुणाचा गेम करणार ?

त्यामुळे वसंत मोरेंना पुन्हा एकदा डावलल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. मात्र, वसंत मोरेंना खरंच डावलंल आहे का? या कार्यक्रमादरम्यान नेमकं काय घडलं? वसंत मोरेंना पाठिमागे उभं राहून भाषण ऐकण्याची वेळ का आली? या सर्व प्रश्नाची उत्तरं पाहुयात...

Vasant More
Nitin Deshmukh : उद्धव ठाकरे गटाचा तिसरा आमदार अडकला

वसंत मोरेंना डावलल्याच्या चर्चा; खरे काय घडले?

पुण्यात अशोक सराफ यांच्या वाढदिवसानिमित्त 'अशोक पर्व' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हा पुण्यातील यशवंतराव चव्हाण सभागृहात कार्यक्रम होता. यावेळी राज ठाकरे यांचं भाषण झालं. हे भाषण ऐकण्यासाठी मनसेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. तसेच यावेळी मोठ्या प्रमाणात नागरिकांनीही हजेरी लावली होती. कारण हा कार्यक्रम पक्षाचा नसून अशोक सराफ यांच्या वाढदिवसानिमित्तचा होता.

त्यामुळे या सभागृहात मोठी गर्दी अन् नागरिकांना बसण्यासाठी जागाही राहिली नव्हती. त्यामुळे काही जणांना पाठीमागे उभं राहण्याची वेळ आली. यामध्ये मनसेचे नेते वसंत मोरे (Vasant More) देखील उभे होते. तर ते जेथे उभे होते तेथेच मनसेचे काही नेते बसलेले होते.

त्यामुळे त्यांना पुन्हा एकदा डावलल्याच्या चर्चा सुरू झाल्या. तसेच त्यांचे उभे राहिलेले काही फोटो व्हायरल झाले. पण डावलल्यात आल्याच्या चर्चामध्ये किती तथ्य आहे? असा सवालही आता राजकीय वर्तुळात उपस्थित करण्यात येत आहे. कारण हा कार्यक्रम पक्षाचा नव्हाता, त्यामुळे कोणत्याही व्यक्तीला डावलण्याचा प्रश्न येतो कुठे? अशी चर्चाही राजकीय वर्तुळात सुरू आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com