Chinchwad By Election Result : विजयानंतर भाजपचा जल्लोष नाहीच; लक्ष्मण जगतांच्या स्मृतीस्थळी अभिवादन

Ashwini Jagtap : चिंचवडकरांना विकासकामांचे स्मरण असल्याची पदाधिकाऱ्यांची भावना
Late MLA Laxman Jagtap's memorial
Late MLA Laxman Jagtap's memorialSarkarnama

Pune By Election Result : चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे निधन जानेवारीत झाले. त्यांच्या निधनानंतर फेब्रुवारीमध्ये चिंचवडला पोटनिवडणूक लागली. त्या निवडणुकीचा आज निकाल लागला आहे. त्यात भाजपच्या उमदेवार आणि दिवंगत आमदार यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांचा दणदणीत विजय झाला आहे.

या विजयाचा भाजपने आनंदोत्सव साजरा केला नाही. हा मिळालेल्या विजय दिवंगत आमदार जगतापांना समर्पित केला. तसेच त्यांच्या स्मृतीस्थळावर अश्विनी जगताप यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी अभिवादन केले.

चिंचवडचा विजय हा दिवंगत आमदार (Laxman Jagtap) जगतापांना समर्पित करीत असल्याचे भाजपचे पिंपरी-चिंचवड अध्यक्ष आणि भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनीही स्पष्ट केले आहे. पिंपरी-चिंचवडकरांनी विकासाच्या मुद्यांवर मतदान केले.

दिवंगत लक्ष्मण जगताप यांनी शहराच्या Chinchwad प्रगतीमध्ये मोठे योगदान दिले आहे. त्याचे स्मरण इथल्या भूमिपुत्रांनी आणि सर्वसामान्य नागरिकांनी ठेवले, असे लांडगे म्हणाले. अत्यंत प्रतिष्ठेच्या या निवडणुकीत महायुतीवर विश्वास दाखवल्याबद्दल त्यांनी मतदारांचे आभार मानले. रात्रं-दिवस मेहनत घेणारे महायुतीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या एकत्रित लढ्याचा हा विजय आहे. तो शहराच्या वाटचालीच्या दृष्टीने अत्यंत महत्वपूर्ण असल्याचेही लांडगे म्हणाले.

Late MLA Laxman Jagtap's memorial
Chandrashekhar bawankule : भाजपचा कसब्यात पराभव का झाला? बावनकुळेंनी सांगितलं कारण...

आनंदोत्सव नाही

ही निवडणूक दिवंगत आमदार जगतापांच्या निधनामुळे लागली होती. त्यांच्या निधनामुळे शहराची मोठी हानी झालेली आहे. त्यामुळे या निवडणुकीतील विजयाचा पिंपरी-चिंचवड भाजपने शहरात जल्लोष केला नाही. पक्षाचे सर्व पदाधिकारी, माजी नगरसेवक हे दिवगंत आमदार जगताप यांच्या स्मृतीस्थळी सायंकाळी जमले. तेथे त्यांनी अभिवादन केले.

ही निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी अपेक्षा होती. त्यासाठी विरोधी पक्षाच्या नेत्यांनी पुढाकार घेतला नाही. निवडणुका येतील आणि जातील. पण, एखाद्या व्यक्तीने आयुष्यातील ३० वर्षे शहराची सेवा केल्यानंतर त्यांच्या निधनाने आपण संवेदनशीलता दाखवत नसेल, तर भावी पिढी आपल्याकडून काय आदर्श घेईल? अशी खंत आमदार लांडगे यांनी यावेळी व्यक्त केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com