पालकमंत्र्यांची नेमणूकच नाही, जनतेने कोणाकडे जायचं? सुप्रिया सुळेंचा सवाल

Supriya Sule : भाजपात बाहेरून आलेल्यांचा मान सन्मान केला जातो. अनेक वर्षे संघर्ष केलेल्या भाजप कार्यकर्त्यांचं मला वाईट वाटतं.
Supriya Sule
Supriya SuleSarkarnama

पुणे : आज खासदार सुप्रिया सुळे यांनी पुणे मनपाचे आयुक्त विक्रम कुमार यांची भेट घेतली. 'अजित पवार पालकमंत्री असताना पुण्यातील कामांचा आढावा घेत होते, मात्र आता जिल्ह्याला पालकमंत्रीच नाही, त्यामुळे कामांचा आढावा होत नाही. वारजे, खडकवासला या भागात पाणीकपातीचा प्रश्न भेडसावत आहे. कचऱ्याची समस्या आहे. अजूनही पालकमंत्र्यांची नेमणूकच नाही, सर्वसामान्य जनतेने कोणाकडे जायचे ? असा सवाल सुळे यांनी यावेळी माध्यमांशी संवाद साधताना उपस्थित केला.

देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांच्या बारामती दौऱ्यावरही सुळे यांनी भाष्य केले. मला आनंद होत आहे की देशाचे अर्थमंत्री बारामतीत येत आहेत. मी त्यांचं स्वागत करते. बारामती लोकसभा मतदार संघात अनेक चांगल्या गोष्टी, संस्था आहेत त्यांना जर खरच वेळ मिळाला तर त्यांनी भेट द्यावी, असा टोला सुळे यांनी सीतारमन यांना लगावला.

अनेक जण भाजपमध्ये जातात आणि त्यांना मोठी जबाबदारी मिळते, पणं मला एका गोष्टीचं वाईट वाटत की, जेव्हा संघर्षाचा काळ होता तेव्हा भाषण देण्यापासून ते सतरंज्या उचलण्याचं काम ज्या भाजप कार्यकर्त्यांनी केलं, त्यांचा आता भाजपात मान सन्मान होत नाही. पणं बाहेरून आलेल्याचा मान सन्मान केला जातो. मला अनेक वर्षे संघर्ष केलेल्या कार्यकर्त्यांच वाईट वाटतं, अशा शब्दात सुळे यांनी भाजपवर निशाणा साधला.

नवाब मलिक यांना पक्षाने कधीही डावलले नाही, मी रोज त्यांच्या मुलींशी बोलत असते. अजूनही ते आमचे चीफ स्पोक पर्सन आहेत. त्यामुळे नवाब मलिक, अनिल देशमुख आणि संजय राऊत यांच्या कुटुंबाशी माझा २४ तास माझा संपर्क असतो, असेही सुळे यांनी सांगितले.

मुख्यमंत्री हे पद खूप मोठे असते आणि ते सर्वसमावेशक असले पाहिजे, असे पवार साहेब म्हणाले होते. आमच्या ही काळात दसरे मेळावे व्हायचे. दिलदारपणे त्या व्यासपीठावर आमच्या विरोधात भाषणे व्हायची, आम्हीही उत्सुकतेने ते ऐकायचो आणि पाहायचो. मोठा नेता हा फक्त पदाने नाहीतर कर्तुत्वाने होतो आणि दिलदार असतो. मोठा नेता दिलदार असला पाहिजे. दसरा मेळाव्यावर राजकारण होणे हे दुर्दैवी आहे. महाराष्ट्राच्या संस्कृतीला ही न शोभणारी गोष्ट आहे. पवार साहेब मुख्यमंत्री असताना बाळासाहेब शिवतीर्थावरुन दिलदारपने टीका करायचे, असे जोरदारपणे सुळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सुनावले.

Supriya Sule
ग्रामपंचायतीचा धुराळा : भाजप एक नंबर तर शिवसेनेची पीछेहाट, अनेक दिग्गजांना धक्का!

राष्ट्रवादी बद्दल गॉसिप करायला लोकांना खूप आवडतं. अजित पवार आणि जयंत पाटील हे दोघेही विकासमकामात आणि पक्ष संघटनेत खूप व्यस्त आहेत. त्यामुळे ते गॉसिप मध्ये फारसा वेळ घालवत नाहीत. म्हणूनच पक्षाचा परफॉर्मन्स एवढा चांगला झाला आहे. आमच्या कुटुंबाबद्दल आणि पक्षाबदल जेवढी आमची चर्चा घरात नसते तेवढी बाहेर असते.. एन्जॉय करा, असे म्हणत सुळे यांनी अजित पवारांच्या नाराजीच्या बातम्या फेटाळून लावले

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विदर्भ दौऱ्याबाबत सुप्रिया सुळे म्हणाल्या, प्रत्येक पक्षाला संविधानाने अधिकार दिलाय, प्रत्येकाला अधिकार आहे पक्ष वाढवायचा. त्यामुळे कुणी कुठे गेले तर त्यात गैर काय?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in